Rama Kankonkar  Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar: सरकार पक्ष अपयशी! काणकोणकर हल्ला प्रकरणातील संशयितांना पोलिस कोठडी नाकारली

Rama Kankonkar Attack: रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील संशयितांना आणखी पोलिस कोठडी मिळायला हवी, याची अनिवार्यता न्यायालयात पटवून देण्यास सरकार पक्ष अपयशी ठरला.

Sameer Panditrao

पणजी: समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील संशयितांना आणखी पोलिस कोठडी मिळायला हवी, याची अनिवार्यता न्यायालयात पटवून देण्यास सरकार पक्ष अपयशी ठरला. त्यामुळे मेरशी येथील जेएमएफसी न्यायालयाने सर्व आठही संशयितांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली.

पुढील सुनावणीसाठी सर्व संशयितांना १० ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांना पुरावे आढळले तर नवीन कायद्यानुसार पोलिस कोठडी घेता येईल, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

या प्रकरणात सुरुवातीला पाचजणांना अटक करून त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोघांना अटक झाली आणि त्यांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यानच्या पोलिस चौकशीत काही संशयितांनी जेनिटो कार्दोज याच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याचे कबूल केल्याने पोलिसांनी जेनिटोला अटक केली. सुरुवातीला त्याला दोन दिवसांची कोठडी देण्यात आली होती.

या प्रकरणातील सर्व आठ संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने केवळ दोन दिवसांचीच पोलिस कोठडी वाढवली होती.

आज पुन्हा संशयितांना न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी आणखी तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, कोठडीचा उद्देश पूर्ण झालेला दिसत असल्याचे नमूद करून न्यायालयाने सर्व संशयितांना न्यायालयीन कोठडी बजावली.

जेनिटोचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात

या सुनावणीदरम्यान जेनिटो कार्दोज याच्या वकिलांनी सांगितले की, त्याचा मोबाईल आधीच पोलिसांच्या ताब्यात असल्याने पुढील पोलिस कोठडीची गरज नाही. तसेच पोलिसांना आवश्यक असलेले सहकार्य करण्यास जेनिटो तयार असल्याचेही त्याच्या वकिलांनी स्पष्ट केले.

...तर पुन्हा पोलिस कोठडी शक्य

या प्रकरणात जर पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे सापडले तर न्यायालयीन कोठडीत गेलेल्या संशयितांना पुन्हा पोलिस कोठडी मिळविण्यासाठी सरकार पक्षाला जिल्हा व सत्र न्यायालयात जाता येते. त्यामुळे या प्रकरणात नवीन कायद्यानुसार संशयितांना पुन्हा पोलिस कोठडी बजावली जाऊ शकते.

१ पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर संशयितांनी मडगावला जाण्यासाठी दोन वाहने वापरली होती.

२ सांताक्रूझ ते नुवेपर्यंत वापरलेले वाहन पोलिसांच्या ताब्यात आहे; मात्र मडगावसाठी वापरलेले दुसरे वाहन अद्याप सापडलेले नाही. त्याचा शोध सुरू आहे.

३ तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संशयितांच्या हातात असलेला चाकूदेखील पोलिसांना अद्याप मिळालेला नाही.

४ काणकोणकर यांच्या वरील हल्ल्यानंतर डिलीट केलेले व्हॉट्स ॲप मेसेजेस पुनर्प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

५ तसेच संशयितांपैकी एकाने मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा संशय असून तो व्हिडिओही पुनर्प्राप्त करण्याची कारवाई सुरू असल्याचे न्यायालयात कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT