aadhar card  Dainik Gomantak
गोवा

Aadhar Card : आधार कार्ड देण्यात राजू नेपाळीचा हात! चौकशी व्हावी

Aadhar Card : पोलिसांना संपूर्ण माहिती पुरविली : नगरसेवक आमोणकरांचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

Aadhar Card : मडगाव, रुमडामळ-हाऊसिंग बोर्ड येथे नेपाळी नागरिकांना चार ते पाच हजार रुपये आकारून आधार कार्ड तयार करून दिले जाते, अशा आशयाचा व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली आहे.

राजू नेपाळी नावाचा एक एजंट या बेकायदेशीर व्यवहारामध्ये सक्रिय असून तोच या नेपाळी नागरिकांना घेऊन मडगावमध्ये येऊन ही आधार कार्ड करून घेतो, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

राजू नेपाळी याचे नाव मी पोलिसांना दिले आहे. पोलिसांनी त्यासंदर्भात कसून चौकशी करावी, अशी मागणी या गोष्टीचा पर्दाफाश करणारे मडगावचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी केली. हा राजू नेपाळी उत्तर गोव्यात राहात असल्याची माहितीही मिळाली आहे. यासंदर्भात मायणा-कुडतरी पोलिसांनी चौकशीही सुरू केली आहे.

मात्र, त्‍यांच्‍याताला फारसे काही धागेदोरे लागलेले नाहीत.

नगरसेवक आमोणकर यांनी जो व्‍हिडिओ पोलिसांना दिला, त्‍यात दोन इसम आपण आधार कार्ड बनवून घेण्‍यासाठी आलो आहोत आणि आमच्‍याकडून चार हजार रुपये वसूल केले, असे सांगताना दिसतात.

हे दोन्‍ही इसम आपण नेपाळचे नागरिक असल्‍याचे सांगतात. हे दोन इसम कोण, त्‍याचा आम्‍ही शोध घेत आहोत. ते इसम हाती लागले तर त्‍यांना रुमडामळ येेथे कुणी आणले आणि त्‍यांच्‍याकडून कुणी पैसे घेतले, याची माहिती मिळू शकेल, असे पोलिस निरीक्षक देसाई यांनी सांगितले.

गैरप्रकाराबाबत ऑपरेटर अनभिज्ञ

पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांना यासंदर्भात विचारले असता, ज्‍या आधार कार्ड केंद्र ऑपरेटरच्‍या विरोधात हा आरोप होत आहे, त्या महिलेला आज पोलिस स्‍थानकात बोलावून आम्‍ही चौकशी केली.

मात्र, ती ऑपरेटर सांख्‍यिकी खात्‍याने नेमलेली अधिकृत ऑपरेटर असून आपल्‍या कार्यालयाच्‍या बाहेर जर कुणी काही सांगितले असेल, तर मला त्‍याची काहीच माहिती नाही, असे तिने पोलिसांना सांगितले.

माहिती न जुळल्यास कार्ड अशक्य

आधार कार्ड बारकोड स्‍कॅनिंग करून तयार करावे लागते. त्‍यामुळे कुणीही बनावट दाखले घेऊन आल्‍यास आधार कार्ड केंद्राच्‍या सिस्‍टमप्रमाणे माहिती न जुळल्‍यास आधार कार्ड तयार होतच नाही, अशी माहिती त्‍या ऑपरेटरने पोलिसांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT