Panic In Delhi-Goa Flight Due To passenger tried to Open Door Dainik Gomantak
गोवा

Delhi Goa Flight: दिल्ली-गोवा फ्लाइटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न; राजस्थानच्या प्रवाशाविरोधात गुन्हा

Delhi Goa Flight:दोबाळी विमानवर लँड होणाऱ्या फ्लाईटमध्ये सोमवारी (दि.25) ही घटना घडली.

Pramod Yadav

Delhi Goa Flight

दिल्ली-गोवा दरम्यान जाणाऱ्या एका फ्लाईटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. राजस्थानमधील एका प्रवाशाने फ्लाईटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दोबाळी विमानवर लँड होणाऱ्या फ्लाईटमध्ये सोमवारी (दि.25) ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून गोव्यात येत असलेल्या इंडिगो फ्लाइटमध्ये एक राजस्थानचा प्रवासी होता. प्रवाशाने फ्लाइटचा स्टारबोर्ड दरवाजा उघडण्याचा कथित प्रयत्न केल्याने विमानातील सर्व प्रवासी घाबरले.

प्रवाशाने सहप्रवाशांचा जीव धोक्या घातल्याप्रकरणी त्याच्या विरोधात दाबोळी विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

प्रवाशाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यामुळे विमानातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि वॉर्निंग अलर्ट वाजू लागले. यामुळे फ्लाइटमधील इतर प्रवाशांची आणि क्रूची सुरक्षा धोक्यात आली.

दाबोळी विमानतळ पोलिसांनी प्रवाशाविरोधात भारतीय दंड विधान कलम 336 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT