Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! नोकरी देतो सांगून करायचा अत्याचार, पीडित युवतींचा हवालासाठी ‘कुरियर गर्ल्स’ म्‍हणून करायचा वापर

Raj Thakur Case: हवालाची रक्‍कम योग्‍य त्‍या ठिकाणी पोचविण्‍यासाठी राज हा पीडित युवतींचा ‘कुरियर गर्ल्स’ म्‍हणून वापर करीत होता, अशी धक्कादायक माहितीही पोलिस सूत्रांनी दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: भोळ्‍या भाबड्या युवतींना बलाढ्य पगाराची नोकरी देतो, असे सांगून त्यांना आपल्या जाळ्यात अडकून नंतर त्यांचे विवस्‍त्रावस्‍थेतील व्‍हिडिओ काढून ‘ब्‍लॅकमेल’ करण्‍याच्‍या आरोपाखाली अटकेत असलेल्या राज प्रशांत ठाकूर याचा हवाला प्रकरणातही हात असण्‍याची शक्‍यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.

हवालाची रक्‍कम योग्‍य त्‍या ठिकाणी पोचविण्‍यासाठी राज हा पीडित युवतींचा ‘कुरियर गर्ल्स’ म्‍हणून वापर करीत होता, अशी धक्कादायक माहितीही पोलिस सूत्रांनी दिली आहे. संशयित राज प्रशांत ठाकूर याचा हवालाशी निगडीत असलेल्‍या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असावा असा संशय व्यक्त करीत पोलिसांनी तपासाकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

राज हा युवतींना बलाढ्य पगाराची नोकरी देतो, असे सांगून त्यांच्यावर अत्याचार करीत होता. तसेच त्‍यांचा वापर हवाला  ‘ट्रान्‍झेक्‍शन’ साठी करीत  होता. त्याने अशा प्रकारे अनेक युवतींना आपल्या जाळ्यात ओढले होते, असे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे.

अनेक युवतींना फसवले

रुबाबदार चेहरा असलेला राज हा बोलण्‍यात पटाईत असून त्‍यातूनच त्याने अनेक युवतींना फसविले आहे. म्‍हापसा येथील एका युवतीवर लैंगिक अत्‍याचार केल्‍याच्‍या तसेच खंडणी वसुल केल्‍याच्‍या आराेपाखाली फातोर्डा पोलिसांनी मागच्या आठवड्यात त्याला अटक केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी या अत्याचाराला वाचा फोडली होती.

पाजिफोंड  येथे एका फ्लॅटवर आणून, त्याने पिडीतावर हा लैगिक अत्याचार केला होता.  राजसह  अँथनी डिसोझा, सिद्धार्थ कांबळी व ज्योती नागवेकर यांच्यावरही पोलिसांनी  भारतीय  न्याय संहितेच्या ६१२ (२), ६४ व ३५१ (२) कलमाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक नॅथन  आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. देवीदास हे पुढील तपास करीत आहेत.

राजकडे तीन वेगवेगळी आधारकार्ड

राज  ठाकूर हा सध्या फातोर्डा पोलिसांच्या अटकेत असून, सध्या त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे.   राज याला पुण्यात अटक केली होती. आपण मूळ पनवेल येथील असल्याचे राज सांगत असला तरी त्याच्याकडे याबाबत कुठलाही पुरावा नाही. उलट त्याच्याकडे गोव्यातील मडगाव, फोंडा व जुने गोवा या पत्त्‍यावरील तीन वेगवेगळी आधारकार्ड असल्याचे उघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Bust: कळंगुट पोलिसांची मोठी कारवाई; सिकेरीत 'इतक्या' लाखांच्या गांजासह पश्चिम बंगालचा तस्कर गजाआड

Ajit Pawar: "हो ला हो अन् नाही ला नाही" सांगणारा सिंह हरपला! गडकरींनी सांगितला अजितदादांच्या रोखठोक निर्णयांचा किस्सा

Ajit Pawar Funeral: महाराष्ट्र पोरका झाला! 'अजित दादा' अनंतात विलीन; मुख्यमंत्री सावंतांनी साश्रू नयनांनी वाहिली श्रद्धांजली

Shocking News: क्रिकेटविश्वात खळबळ! दिल्लीच्या खेळाडूंकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड

Goa Liquor Smuggling: महसूल बुडवला, बनावट बिलं बनवली! 1 कोटींच्या बनावट दारु तस्करीचा मास्टरमाइंड जेरबंद; सांगलीच्या शैलेश जाधवला अटक

SCROLL FOR NEXT