म्हापसा: गावसावाडा-म्हापसा येथे पावसाचे पाणी काही घरात शिरले. त्यामुळे या संबंधित कुटुंबीयांची मोठी तारांबळ उडाली. अनधिकृतपणे परस्पररित्या मातीचा भराव टाकून शेत जमिनीसह नाले बुजविल्याचा गावसावाड्यातील रहिवाशांना फटका बसला.
(Rainwater in the house in mapusa)
मंगळवारी सकाळी मुसळधार पावसाचे पाणी प्रभाग 20 मधील काही घरांच्या आवारात घुसले. गडेकर कुटुंबीयांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पाणी आले होते. त्यामुळे या कुटुंबाची मोठी धांदळ उडाली. हा प्रकार नगरसेवक प्रकाश भिवशेट यांना समजताच त्यांनी पालिका मुख्याधिकारी सीताराम सावळ यांना कल्पना दिली.
त्यानंतर लगेच पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मातीचा भराव टाकून बुजविलेले नाले जेसीबीच्या साहाय्याने उपसले व पाण्याला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर पावसाचे पाणी उतरण्यास सुरुवात झाली व गडेकर कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गंभीर स्थितीची शक्यता
गावसावाडा येथे मातीचा भराव टाकून मोठ्या प्रमाणात शेत जमिनी बुजवल्या आहेत. शिवाय नाले सुद्धा बुजल्याने पावसाळ्यात या परिसरात पूर सदृश्यस्थिती निर्माण होण्याची शक्यता मी यापूर्वीच व्यक्त करीत पालिकेच्या कानावर हा प्रकार घातला होता. नुकताच सुरुवात झालेल्या पावसात हा प्रकार घडला असून, भविष्यात ही स्थिती आणखी गंभीर होईल, अशी प्रतिक्रिया नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी व्यक्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.