महाराष्ट्रात भाजप सत्ता स्थापन करणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गोव्यात आणण्याबाबत मात्र बाळगले मौन
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीनंतर राजकारणात घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींनी वेग घेतला आहे. शिवसेनेत पडलेली फूट, दिग्गज नेते शिवसेनेला रामराम ठोकणार असल्याचं चित्र असताना शिवसेना नेत्या आपल्या सहकाऱ्यांना परत येण्यासाठी भावनिक साद घालताना दिसत आहेत. असे असताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्रात भाजप सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पणजी येथे एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. (Maharashtra BJP established Goverment - Chief Minister Pramod Sawant )

CM Pramod Sawant
येत्या तीन दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाष्य केले असुन याबाबत बोलताना त्यांनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील. आणि येणारा काळ महाराष्ट्राच्या भविष्यासाठी चांगला असेल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. पणजी येथे माजी सैनिकांच्या कार्यक्रमादरम्यान बोलत असताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

यावेळी त्यांना महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांना गोव्यात आणले जाणार आहेत का ? असा प्रश्न विचारला असता याबद्दल आत्ताच मी माध्यमांशी बोलू शकत नाही. असे सांगितले. त्यामूळे गोव्यात बंडखोर आमदारांना आणले जाणार का ? यापेक्षा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करणार हा दाखवलेला विश्वास कदाचित महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी केलेल्या चर्चेतून आला असावा अशी ही चर्चा कार्यक्रम स्थळी दबक्या आवाजात सुरु होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com