Rain with strong winds in the Sattari valpoi Honda road closed Dainik Gomantak
गोवा

सत्तरीत वादळी वाऱ्यासह पाऊस, वाळपई-होंडा रस्ता बंद

रेडे घाटी येथे रस्त्याच्या मधोमध झाड पडल्याने वाळपई-होंडा रस्ता बंद

दैनिक गोमन्तक

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रातील वादळसदृश्य परिस्थिती आणि विदर्भाकडून कर्नाटकच्या दिशेने वाहत असलेल्या वार्‍यांमुळे हवामान खात्याने गोव्यातील विविध भागात आज पावसाची शक्यता वर्तवली होती. गेल्या काही दिवसात राज्यात अवकाळी पावसाने मोठ्याप्रमाणावर हजेरी लावली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच सत्तरीत आज पुन्हा पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे रेडे घाटी येथे रस्त्याच्या मधोमध झाड पडल्याने वाळपई (valpoi) -होंडा रस्ता बंद झाला आहे.

दरम्यान, यंदाचा नैऋत्य मोसमी पावसाचा IMD ने अंदाज वर्तवला असून संपूर्ण देशात नैऋत्य मोसमी पावसाचा (जून ते सप्टेंबर) पाऊस सामान्य असण्याची शक्यता आहे. यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान (Weather) खात्याने दिली.

विदर्भ ते कर्नाटकापर्यंत वाऱ्याचा वेग तसेच दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात वार्‍याची उपस्थिती असल्याने, गोव्यात (Goa) 2 दिवस सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात 14 आणि 15 एप्रिलपर्यंत गडगडाटी पावसाची (Rain Update) शक्यता कायम राहील.

14 एप्रिल रोजी दोन्ही जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी ताशी 40-50 किमी वेगाने वाहणाऱ्या विजांचा आणि वाऱ्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. तसेच येत्या 4-5 दिवसात तापमानात कोणतीही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT