Rain water Harvesting Gomantak Digital Team
गोवा

Rain Water Harvesting : ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’साठी मिळते 50 टक्के अनुदान!

५ लाखांपर्यंत साहाय्‍य : कुटुंब, निवासी संकुल, शाळा-महाविद्यालयांसाठी जलसंवर्धन योजना

गोमन्तक डिजिटल टीम

योगेश मिराशी

गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याचा कार्यकाळ वाढत चालला आहे. नियमित पाऊस पडणाऱ्या परिसरातही आपल्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागतेय. जलसंधारण व भूजल पुनर्भरण हाच त्यावरील शाश्‍‍वत उपाय आहे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ योजना त्‍यासाठी फायदेशीर ठरत आहे. कुटुंबासाठी किंवा निवासी संकुलासाठी ही प्रणाली राबवायला लागणाऱ्या खर्चाच्या 50 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान किंवा एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते मिळते.

तसेच निवासी संकुले, इमारती, खासगी गृहनिर्माण संस्था, खासगी शाळा, महाविद्यालयांसाठी खर्चाच्या 50 टक्‍क्‍यांपर्यंत किंवा 5 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते मिळते.सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या गोव्यात अनेक गावांमध्ये मार्च महिन्‍यानंतर टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक, वैयक्तिक स्तरावर ग्रामीण भागातील पाणी समस्‍येवर थोड्याफार प्रमाणात तोडगा काढण्यास सुरूवात केली आहे.

अशा वेळी पावसाळ्‍यात छतावर पडणारे पाणी पुनर्भरणासाठी वळविले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, भातशेतीसाठी बंधाऱ्यांची वार्षिक दुरुस्ती करणाऱ्या शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मध्यंतरी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ धोरणात सुधारणा केली होती. त्‍यामुळे जलस्त्रोत विभागाला शेतकरी, सोसायटी आणि स्वयंसेवी संस्थांच्या गटाला छतावरील पावसाचे पाणी साठवण आणि भूजल पुनर्भरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची परवानगी मिळते.

या धोरणातील दुरुस्तीमुळे शेतकरी व इतरांच्या गटांना एक हेक्टर जमिनीत खड्डे मारता येतील. ज्यात 600 लीटर पाणी साठवता येईल, ज्यामुळे भूजल टेबल पुनर्भरण आणि नापिक जमिनीची लागवड करण्यात मदत होईल. यापूर्वी ही योजना फक्त जमीन ताब्यात असणाऱ्यांनाच लागू होती. मात्र दुरुस्तीनंतर जमीन त्यांची नसल्यासही शेतकऱ्यांच्‍या गटास खुल्या जागेत खड्डा खोदता येतो.

या धोरणानुसार दोन हजार चौरस मीटर व जास्त क्षेत्रफळावरील निवासी संकुलांसाठी ते अनिवार्य. दीड हजार चौरस मीटर आणि जास्त क्षेत्रफळाच्या भूखंडावरील व्यावसायिक संकुल आणि दहा हजार चौरस मीटर व जास्त क्षेत्रफळावरील औद्योगिक युनिट्स तसेच सर्व सरकारी इमारती, शाळा व महाविद्यालयांमध्‍ये रेन वॉटर हार्वेस्टिंग हाती घेणे गरजेचे आहे.

‘धवरुख’ संस्थेकडून हजारो झाडांची लागवड

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झटावे’ या तत्त्वावर व निव्वळ निसर्गप्रेमापोटी मांद्रेत ‘धवरुख’ संस्थेची स्थापना केल्याचे या संस्थेचे अध्यक्ष रुद्रेश म्हामल सांगतात. आतापर्यंत संस्थेने हजारो झाडांची लागवड तसेच ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ संकल्पना ठिकठिकाणी राबविली. संस्थेकडून दर पावसाळ्यात वृक्षारोपण केले जाते. तसेच मे महिन्यात डोंगराच्या उतारावर ठिकठिकाणी चर मारले जातात. त्यामुळे ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ संकल्पना राबवली जाते. शिवाय रानातील तळींचे साफसफाई केली जाते.

खारीचा वाटा तुम्‍हीही उचला…!

गोव्यात पावसाळ्यात सरासरी 120 दिवस पाऊस पडतो. अशा वेळी भूजल पुनर्भरण प्रणालीचा वापर केल्यास आपण मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत जिरवू शकतो. घराकडे मारलेला खड्डा दिवसाला किमान तीन वेळा पाण्याचा बॅरल पाणी भरून जमिनीत जिरवतो. त्यामुळे हंगामात लाखो लिटर पाणी जमिनीत जाते. हा लहानसा उपक्रम सर्वांनी राबविल्यास मोठ्या प्रमाणात पाणी जिरवू शकतो. विशेष म्‍हणजे एकदाच ही प्रणाली करून ठेवल्यास पुन्हा-पुन्हा त्‍यासाठी त्रास घ्‍यावा लागत नाही.

पाणी अडवा-पाणी जिरवा’ काळाची गरज

  • जलस्त्रोत खात्‍याकडून वार्षिक उत्कृष्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग सरावसाठी प्रशस्तीपत्र व 25 हजार रुपये प्रतितालुका तर राज्य पातळीवर 50 हजारांचे बक्षीस. या श्रेणीत प्राथमिक व माध्यमिक शाळा, उच्च माध्‍यमिक शाळा आणि पूर्व विद्यापीठ शिक्षण संस्था, महाविद्यालये, गट गृहनिर्माण, सोसायटी, अर्पाटमेंट, वैयक्तिक घरे, पालिका-पंचायत इमारती, एनजीओ समाविष्‍ठ.

  • भूजल संवर्धन उपक्रम राबविणाऱ्या धवरुख संस्थेचे अध्यक्ष रूद्रेश म्हामल यांनी सांगितले की, जर आज पाण्याचे व्यवस्थापन योग्य केले तर भावी पिढीला खूप दिलासादायक ठरेल. यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही काळाची गरज बनली आहे.

  • पाण्याची टंचाई ही सर्वत्र भेडसावते. क्राँकीट जंगलांमुळे जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी खालावली आहे. गोव्यात मुबलक पाऊस असूनही पाणी जमिनीत न मुरता ते ओहोळ, नाला व नदीच्या माध्यमातून समुद्रास जाऊन मिळते. झाडांची कत्तल, काँक्रीटचे जंगल यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. त्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेवर भर दिला पाहिजे.

  • त्‍यासाठी जमिनीत खड्डा खोदून त्यात छिद्रे केलेला बॅरल ठेवायचा. छपरावरील पाणी पाईपच्या साहाय्‍याने खाली आणून ते बॅरलमध्ये सोडायचे, जेणेकरुन हे पाणी हळूहळू जमिनीत मुरेल व पाण्याची पातळी वाढेल.

  • धवरुख संस्थेने आतापर्यंत विविध ठिकाणी भूजल पुनर्भरणाचे 29 प्रकल्प राबविले आहेत. शैक्षणिक संस्था तसेच वैयक्तिक स्तरावर हे प्रकल्प हाती घेतले आहेत.

  • धवरुख संस्था भूजल संवर्धनाचे काम मागील सात वर्षांपासून करते. मांद्रे पंचायत क्षेत्रासह पेडणे, डिचोली व सत्तरी भागात हे प्रकल्प संस्‍थेकडून राबविण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT