Rain in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: गोव्यात साखळी, डिचोली, सत्तरी भागात जोरदार पावसाला सुरवात

भारतीय हवामान विभागाकडून गोव्यात पुढील तीन दिवस यलो अलर्ट; वाळपईला जोरदार तडाखा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Rain: गोव्यातील साखळी, डिचोली, सत्तरी भागात जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) याआधीच गोव्यात यलो अलर्ट जारी केला होता. वाळपई परिसराला पावसाने जोरदार तडाखा दिला असून येथे सर्वत्र पाणी साचले आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.

सायंकाळी चारच्या सुमारास ढग भरून आले आणि वेगाने वारे वाहण्यास सुरवात झाली. त्यानंतर गोव्यातील वरील भागांमध्ये जोरदार पावसाला सुरवात झाली. जोरदार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तथापि, उकाड्याच्या पार्श्वभुमीवर आलेल्या पावसाच्या जोरदार सरींमुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, गोव्यात इतरत्र ढगांमुळे अंधारून आले होते. पणजीसह आसपासच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वीजांचा कडकडाटासह पाऊस झाला.

भारतीय हवामान विभागाने दक्षिण भारतातील कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांना आगामी पाच दिवसात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दोन्ही राज्यांना आयएमडीने यलो अलर्ट जारी केलेला आहे.

हवामान विभागाने गोव्यासह अरुणाचल प्रदेश, आसम, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडु आणि अंदमान-निकोबार बेटांवर पावसाची शक्यता वर्तवली होती. देशात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे पुर्वेकडील राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TVS Jupiter: खास तुमच्यासाठी! दमदार इंजिन, स्टायलिश लूक आणि आधुनिक फीचर्ससह 'टीव्हीएस जुपिटर'चे नवे मॉडेल लॉन्च

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

Viral Video: सायकलस्वाराचा जीवघेणा स्टंट! सोशल मीडियावर खरतनाक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'याला लवकर मरायचंय का?'

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

SCROLL FOR NEXT