Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Fengal Cyclone Goa Rain: गोव्यातही ‘फेंगल’ चक्रीवादळाचा इफेक्ट? साखळी, कुडचडे, सत्तरीला पावसाने झोडपले

Yellow Alert In Goa: गोवा हवामान खात्याच्या वेधशाळेने राज्यात शुक्रवारी (०६ डिसेंबर) रोजी पावसाचा यलो अलर्ट जारी केला होता.

Pramod Yadav

Fengal Cyclone Goa Heavy Rain

साखळी: गोव्यात अवकाळी पावसाने शुक्रवारी (०६ डिसेंबर) दुपारी जोरदार हजेरी लावली. पावसाने राज्यातील साखळ, सत्तरी, माशेल आणि कुडचडे भागाला झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान खात्याच्या वेधशाळने आजच्या दिवशी पावसाचा शक्यता व्यक्त केली होती.

पुढील तीन तासांत वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसासह शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन तासांत राज्यातील दोन्ही जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या डिचोली, सत्तरी, धारबांदोडा, सांगे, काणकोण आणि केपे या तालुक्यात पावसाचे ढग असल्याचे खात्याने म्हटले आहे. इतर तालुक्यात देखील हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.

हवामान खात्याने दिला होता यलो अलर्ट

हवामान खात्याने गोव्यात आज (०६ डिसेंबर) यलो अलर्ट जारी करत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली होती. वेधशाळेने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून, राज्यातील विविध भागांना पावसाने झोडपून काढले.

‘फेंगल’ चक्रीवादळाचा इफेक्ट?

दक्षिण भारतातील तमिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुद्दुचेरीला अतिवृष्टीचा फटका बसला. शहरातील मुख्य भागात पाणी साचने, राहत्या घरात पाणी जाणे यासह शेतीच्या पिकांना देखील याचा फटका बसला.

गोव्यात देखील ‘फेंगल’ चक्रीवादळाचा इफेक्ट दिसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. गोव्यात पावसाने हजेरी लावली तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस 'झेडपी' निवडणुकीबाबत गंभीर आहे?

SCROLL FOR NEXT