Yellow Alert in Goa Dainik Gomantak
गोवा

Rain In Goa: दिवाळीच्या पहिल्या आंघोळीपर्यंत पडणार पाऊस; गोव्यात पाच दिवस यलो अलर्ट

Goa Weather Update: गोव्यात १६ ते २० असे पाच दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Pramod Yadav

पणजी: मॉन्सूनने माघार घेतली असली तरी पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर दिसण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने राज्यात पाच दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १६ ते २० असे पाच दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे दिवसांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात ३० ते ४० प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

गेल्या चोवीस तासांत राज्यात बहुतांश भागात हवामान कोरडे पाहायला मिळाले. चोवीस तासांत पेडण्यात सर्वाधिक ५१.८ मी.मी, सांगे ९.४, धारबांदोडा ५.२ आणि काणकोण ६.२ मी. मी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, देशातील काही भागांबरोबरच गोव्यातून मॉन्सूने माघार घेतल्याचे हवामान विभागाने सोमवारी (१३ ऑक्टोबर) जाहीर केले आहे. यावर्षी नेहमीपेक्षा लवकर आगमण झालेल्या पावसाने निरोप देखील लवकर घेतला. यावर्षी गोव्यात २५ मे रोजी पावसाचे आगमण झाले होते. नेहमीपेक्षा ११ दिवस अगोदर पावसाने हजेरी लवाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT