Khandepar Goa house collapse Dainik Gomantak
गोवा

Khandepar: देवाक काळजी रे! पावसात कोसळले मातीचे घर, खांडेपार येथील गरीब कुटुंबावर संकट; मदतीला उभे राहिले हात

Khandepar House Collapse: गावठाण- खांडेपार येथील कमलाकांत गावडे यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले. त्यामुळे गावडे कुटुंब बेघर झाले असून सध्या एका तात्पुरत्या झोपडीत आसरा घेतला आहे.

Sameer Panditrao

फोंडा: गावठाण- खांडेपार येथील कमलाकांत गावडे यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले. त्यामुळे गावडे कुटुंब बेघर झाले असून सध्या एका तात्पुरत्या झोपडीत आसरा घेतला आहे. दरम्यान, प्रोग्रेसिव्ह फोंडाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विश्वनाथ दळवी यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत कुर्टी-खांडेपारचे पंच अभिजित गावडे यांच्या सहकार्याने कोसळल्या घरातील साहित्य गोळा करून परिसर साफ केला.

गावडे यांचे आरोग्य त्यांना साथ देत नसल्यामुळे ते सध्या कोणत्या ही प्रकारचे काम करू शकत नाहीत. पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालते. त्यामुळे नवा निवारा उभारणे त्यांच्या आटोक्याबाहेर आहे.

गेल्या पावसात घराची एक भिंत कोसळली होती, परंतु त्याची डागडुजी करणे शक्य न झाल्याने या पावसात घराचा उर्वरित भाग कोसळला. वेळीच सरकारने मदतीचा हात दिला असता तर आज या कुटुंबावर ही स्थिती ओढवली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

या भागात जुनी मातीची अनेक घरे असून पावसाळ्यात ती कोसळण्याची भीती आहे. यामुळे पंचायत तसेच राज्य सरकारने अशा घरांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

पक्का निवारा बांधून देणार : दळवी

प्रोग्रेसिव्ह फोंडा व दळवी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गावडे यांना लवकरच पक्का निवारा बांधून देण्यात येईल. कमलाकांत गावडे हे आजारपणामुळे आपल्याकरता नवा निवारा उभारू शकत नाहीत. अशावेळी एक सामाजिक संस्था म्हणून प्रोग्रेसिव्ह फोंडा आपले दायित्व निभावेल, असे विश्वनाथ दळवी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: रोहन हरमलकरांचा पाय खोलात; जमीन हडप प्रकरणी ईडीने 212 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली जप्त

Goa Assembly Live: नोकऱ्या नसल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात; युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप!

Report: पाकिस्तानात 8700 दहशतवादी सक्रिय! संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा, भारतासाठी धोक्याची घंटा

USA Tariff: रशियाशी जवळीक पडली महागात? अमेरिकेने भारतावर लावला 25 टक्के टॅरिफ, शेअर बाजारात भूकंपाची शक्यता!

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला कधीपर्यंत राखी बांधता येईल? भद्रकाळ टाळा, नेमका शुभमुहूर्त जाणून घ्या

SCROLL FOR NEXT