Goa Rain | tree fell upon house in Calangute  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: गोव्यात पावसाला सुरवात; कळंगुटमध्ये घरावर झाड कोसळून 2 लाखाचे नुकसान

पणजीत अनेक ठिकाणी साचले पाणी

Akshay Nirmale

Goa Rain: गोव्यात आज, शनिवारी सकाळी पावसाला सुरवात झाली. पणजी शहरात थांबून थांबून पाऊस होत आहे. दरम्यान, पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पाणी साचले असून काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत.

कळंगुटमध्ये एका घरावर झाड पडून त्या घराचे सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

कळंगुटमध्ये शांतादुर्गा मंदिराजवळ सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गोकुळदास साळगावकर आणि विष्णु साळगावकर यांच्या घरावर आंबाड्याचे झाड (हॉग प्लम ट्री) कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

पण सर्व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. छत उघडे पडल्याने साळगावकर कुटूंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. साळगावकर कुटूंबांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई होत आहे.

अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने या दुर्घटनेत साळगावकर यांचे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. हे झाड 40 वर्षे जुने आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

डिचोलीच्या दहीहंडीत आमदारांनी धरला ठेका, Video Viral!

Salpe Lake: साळपे तलावासंदर्भात लढा सुरू राहील! आल्वारीस यांचा इशारा; कडक उपाययोजनेची आवश्यकता

Margao: 6 महिन्यांमध्ये 10 कोटींचे लक्ष्य! मडगाव पालिकेने कसली कंबर; 35 कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट्य

SCROLL FOR NEXT