मडगाव : गिर्दोळी - चांदर येथे रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम करताना कोणत्याच नियमांचे उल्लंघन झालेले नाही, असे स्पष्टीकरण भारतीय रेल विकास निगमने गोवा जलश्रोत खात्याला पाठविलेल्या उत्तरांतून केले आहे.
रेल विकास निगमची कामे ही भरतीय रेल्वे (Railways) कायद्यानुसार केली जातात. त्यामुळे त्या कामांची अंमलबजावणी करताना आणि त्या कामांसाठी कामगार (worker) वा बांधकाम साहित्याची ने - आण करताना कोणालाच नोटिसा पाठविण्याची वा कोणाच्या लक्षांत ते आणून देण्याची गरज नसते ही बाब रेल निगमचे सरव्यवस्थापक शशीभूषण साहू यांनी जलश्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता अंकुश गावकर यांना पाठविलेल्या उत्तरांतून स्पष्ट केली आहे. रेल निगमने कोणत्याच कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, तर सर्व कामे त्याला लागू असलेल्या भारतीय रेल्वे कायद्यांतील तरतुदीनुसार केल्याचेही त्यात नमूद केले आहे.
रेल्वे सीमेलगतच्या जमिनीत मानशी बांधण्यासाठी तसेच तेथील जमीन पूर्ववत करण्यासाठी संबंधित खात्याने केलेल्या निवेदनाप्रमाणे निधी बाजूला काढून राखीव ठेवला आहे व गोवा सरकारच्या (Goa Government) मागणीनुसार तो सुपूर्द केला जाईल. या कामांच्या कार्यवाहीवेळी कोणतीच शेतजमीन बुजविलेली नाही की कोणत्याच जलश्रोताला हानी पोचविलेली नाही, उलटपक्षी रेल्वेने नव्याने बांधलेल्या संरक्षक भिंतीमुळे तळ्याला तसेच नाल्यांना संरक्षण मिळालेले आहे तसेच त्यात माती येण्याचे टळणार याकडेही याकडे लक्ष वेधताना हे काम फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण होईल, असे नमूद केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.