Goa Illegal Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Mining: बेकायदा चिरेखाणीवर मये येथे छापा, चारजणांना अटक...

डिचोली पोलिसांनी मये येथे एका बेकायदेशीर चिरेखाणीवर छापा टाकून या व्यवसायाशी संबंधित चारजणांना अटक केली

दैनिक गोमन्तक

Goa Illegal Mining: डिचोली पोलिसांनी मये येथे एका बेकायदेशीर चिरेखाणीवर छापा टाकून या व्यवसायाशी संबंधित चारजणांना अटक केली. तर एका ट्रकसह चिरे काढण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री जप्त केली. डिचोली पोलिसांनी गुरुवारी (ता.३१) मये तलावापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर ही धडक कारवाई केली.

यासंबंधीची माहिती मिळताच डिचोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हरीनाम नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने मये तलाव परिसरात चालू असलेल्या चिरेखाणीवर छापा टाकला. डिचोलीतील चिरेखाणीवरील ही कारवाई अलीकडच्या काळातील मोठी कारवाई आहे.

याप्रकरणी पोलिसांनी जीए-०४-टी-०९२३ या ट्रकचा चालक मुकुंद वसंत केरकर याच्यासह संदीप जोवारी लाकरा, महाबीर लक्ष्मण राम आणि लालदेव लक्ष्मण राम यांना अटक केली.

तसेच जनरेटर आणि चिरे काढण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री जप्त केली. अमर तुयेकर याच्याविरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार विजय मांद्रेकर याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी चिरे काढण्याचा व्यवसाय चालू असलेल्या ज्या खाणीवर छापा टाकला ती खाण सरकारी जमिनीत असल्याची माहिती मिळाली आहे. खाण खाते तसेच अन्य यंत्रणेकडून कोणतीही मान्यता न घेता बेकायदेशीरपणे चिरे काढण्याचा व्यवसाय चालू असल्याचे पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी भादंसंच्या ३७९ रीड विथ ३४ आणि ४ (१) या कलमान्वये संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT