Road Work Canva
गोवा

Raibandar Road: रायबंदर रस्ता शेवटच्या टप्प्यात, पाणी तुंबण्याचा धोका होणार कमी; कंपनीचा दावा

Panaji Smart City Road Work: रायबंदर-पाटो सर्कल ते चिंबल जंक्शन रस्त्याचा शेवटचा टप्पा पूर्ण होणे म्हणजे स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत कामाचा महत्त्वाचा टप्पा पार करण्यासारखे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: रायबंदर-पाटो सर्कल ते चिंबल जंक्शन रस्त्याचा शेवटचा टप्पा पूर्ण होणे म्हणजे स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत कामाचा महत्त्वाचा टप्पा पार करण्यासारखे आहे. हा प्रकल्प केवळ रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारत नाही, तर शहरी पायाभूत सुविधा, पूर प्रतिकार आणि सांडपाणी व्यवस्थापन सुसज्ज करीत असल्यामुळे रहिवाशांचे जीवनमान उंचावणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

सुमारे ८१५ मीटर लांबीच्या या रस्ते विकास प्रकल्पात गटार, मलनिस्सारण, वीज व युटिलिटी अपग्रेडचा समावेश आहे. ड्रेनेज इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनमध्ये सध्याच्या ४८२ मीटर नाल्यांचे नूतनीकरण आणि स्टॉर्म वॉटर व्यवस्थापन सुधारण्यासाठी ४३३ मीटर नवीन नाल्याच्या बांधकामाचा समावेश आहे. नवीन न्याल्यामध्ये तीन आकारांचा समावेश आहे. ज्यामुळे कार्यक्षम पाण्याचा प्रवाह सुनिश्चित होणार आहे. विशेषत: जोरदार पर्जन्यवृष्टीच्या काळात पाणी तुंबण्याचा धोका कमी होणार आहे.

या भागातील मलनिस्सारण अद्ययावतीकरणदेखील एक महत्त्वपूर्ण काम आहे. ज्यामुळे बऱ्याचदा सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन पर्यावरणीय धोके उद्भवत होते. नवीन अद्ययावत प्रणालीमध्ये ८१५ मीटरचे काम पूर्ण झाले आहे. सांडपाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्यासाठी गटार वाहिनी, १९ मॅनहोल आणि ६९ तपासणी चेंबरची निर्मिती, त्याचबरोबर वसाहतींमध्ये ६९ घरजोडणी आणि १२५ अपार्टमेंट कनेक्शन जोडल्या गेल्या आहेत.

हॉट-मिक्सिंगचे काम प्रगतीपथावर

याशिवाय, राज एक्सेलेन्सी अपार्टमेंटजवळ मध्यवर्ती पंपिंग स्टेशन उभारले आहे. या सुविधेमुळे रायबंदरच्या दुसऱ्या फेरीपर्यंत ८०० मीटरपेक्षा जास्त सांडपाणी पंप केले जाणार आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हॉट-मिक्सिंगचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे, चिंबल जंक्शनच्या पूर्वी २५० मीटरच्या एलएचएस रस्त्यावर गटार बांधकाम, मलनिस्सारण वाहिनी घालणे, ८ मॅनहोल, १३ तपासणी चेंबर्स आणि १३ घर जोडणीचे काम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT