Bharatiy Janata Yuva Morcha Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेस कार्यालयासमोरच राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

BJYM Goa: लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद गोव्यात उमटले

गोमन्तक डिजिटल टीम

लोकसभेत हिंदूविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद गोव्यातही उमटले. भाजयुमोच्यावतीने काँग्रेस भवनावर सायंकाळी ४ च्या सुमारास मोर्चा काढीत कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा निषेध केला. त्याचबरोबर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

या आंदोलनात आमदार केदार नाईक, आमदार संकल्प आमोणकर, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार दाजी साळकर, आमदार उल्हास तुयेकर, आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांच्यासह भाजयुमोचे कार्यकर्ते सहभागी झाले. भाजपच्या प्रदेश कार्यालयापासून मोर्चाने येऊन काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलकांनी राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

याप्रसंगी आमदार नाईक म्हणाले, गांधी घराण्याने सतत हिंदूंचा द्वेष केला आहे. विरोधी पक्षनेधे राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वांनी निषेध करावा. आमदार फर्नांडिस म्हणाले, हिंदू हिंसा करतात, असे राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही. गोव्यात हिंदू, ख्रिश्‍चन, मुस्लिम एकत्रित राहतात. भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झेप घेतली आहे, भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यात सरकार विकासाच्या वाटेने जात आहे.

राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी!

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत असल्याचे सागून आमदार आमोणकर म्हणाले, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत प्रत्येक घरात एक लाख रुपये देऊन, त्याचबरोबर राज्य घटना बदलली जाणार असल्याचे दाखवून मत मागितले, तरीही हा पक्ष सत्तेपर्यंत गेला नाही. राहुल गांधी यांनी हिंदू जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयामुळे, ‘मराठा’ उपाधीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर गोव्यात बदल घडला

SCROLL FOR NEXT