अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (Indian National Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दक्षिण गोव्यातील (South Goa) मुरगाव तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या वेलसांव दांडो येथे पारंपरिक मच्छीमार (Fishermen) बंधूशी संवाद साधताना, मी कदापिही गोव्याला कोळसा हब बनू देणार नसल्याची प्रतिज्ञा घेतली. (Rahul Gandhi: I assure that Goa will not become coal hub)
गोव्याचे रक्षण करणे काँग्रेसचे प्रथम कर्तव्य असून त्याचे पालन आम्ही सर्वांनी केले पाहिजे. गोव्यातील मच्छीमार व्यावसायिक येथील समुद्राला देव मानत असल्याने त्या मच्छिमारांच्य पाठीशी काँग्रेस कायमस्वरूपी राहणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिले.
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे शनिवारी (दि.३०) सकाळी ११ वाजता गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन होताच त्यांचे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा काँग्रेस काँग्रेस निरीक्षक तथा माजी वित्तमंत्री पी सी चिदंबरम, गोवा कॉंग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, काँग्रेस कार्याध्यक्ष आलेक्स सिकेरा, गोवा काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, वसंत नाईक, ओलेसियो सिमाईश, मारयान रॉड्रिगीस व इतरांनी स्वागत केले. दाबोळी विमानतळा बाहेर गोवा युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषात राहुल गांधी यांचे स्वागत केले. दाबोळी विमानतळावर ते वेलसांव दांडो समुद्रकिनाऱ्यापर्यंत संपूर्ण वातावरण काँग्रेसमय झाले होते. सर्व ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रीय फलक झळकत होते.
राहुल गांधी वेलसाव समुद्रकिनारी गोव्यातील सर्व मच्छीमार बंधू बरोबर कोळसा निर्यात करणाऱ्या रेल्वे दुपदरी मार्गाच्या बाजूस घरांना धोका निर्माण होणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी समुद्रकिनारी उभारलेल्या मंडपात दाखल होताच त्यांचे सर्वांनी उभे राहून स्वागत केले. यावेळी उपस्थित गोव्यातील विविध मच्छिमार बंधूंनी आपली समस्या राहुल गांधी समोर मांडल्या. तसेच गोवा सरकारतर्फे मच्छिमार बंधूंना मिळणाऱ्या अनुदान कपात केल्याने, अनेकांना त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वेलसांव, कासावली अशा विविध भागातून कोळसा निर्यात करण्यासाठी रेल्वे प्राधिकरणातर्फे दुपदरी करणाचे काम हाती घेतले आहे. यामुळे अनेकांच्या घराना, शेत जमिनीबरोबर झाडांना धोका निर्माण होणार असल्याची माहिती राहुल गांधी समोर जनतेने मांडली.
वेलसांव समुद्रकिनारी उपस्थित मच्छिमार व्यवसायिक व रेल्वे दुपदरीकरणाला धोका निर्माण होणाऱ्या राहुल गांधी यांनी आश्वासन देताना सांगितले की काँग्रेस पक्ष सदैव सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. गोवा राज्य पर्यावरणाने बहरलेले असून येथील निसर्गरम्य समुद्र म्हणजे येथील मच्छिमार बंधूचा देव आहे. तसेच येथील घरे शेतजमिनीचे रक्षण करणे सर्वप्रथम राज्य सरकारचे कर्तव्य असून त्यांनी सामान्य जनतेच्या हितासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. मच्छिमार व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष आपल्या जाहीरनाम्यात विविधा विविध योजना राबविणार आहे. तसेच रेल्वेचे दुपदरीकरण करून गोव्याला कोळसा हब करू देणार नसल्याचे जाहीर करताच उपस्थित सर्वांनी राहुल गांधी यांचे आभार मानले. पर्यावरणाने भारलेल्या गोव्याला कोळसा हब करणे म्हणजे येथे प्रदूषणाला एकाप्रकारे आमंत्रण दिल्यासारखे असणार. रेल्वे दुपदरीकरण करून मध्यमवर्गीयांच्या घरांना धोका निर्माण करून सरकार राज्यात कुठला विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारने सर्वप्रथम जनतेच्या हितासाठी चांगले कार्य करणे गरजेचे असल्याचे गांधी यांनी सांगितले. यावेळी 'गोंयचो एकवट' संघटनेतर्फे राहुल गांधींना निवेदन सादर करण्यात आले.
गोव्याला कोळसा हब करण्यापासून दूर करण्यासाठी काँग्रेस पक्ष सर्व ती मदत येथील जनतेला करणार आहे. गोव्याचा निसर्ग म्हणजे येथील जनतेला मिळालेल्या सर्वात मोठा आशीर्वाद असून येथे राज्य सरकार कोळसाहब करण्याचा प्रयत्न करून जनतेच्या आरोग्याला धोका पोहोचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. यावेळी राहुल गांधी यांनी आपली आई श्रीमती सोनिया गांधी आजारी होती त्यावेळी तिने गोव्यातील समुद्र किनारी व गोव्यातील स्वच्छ पर्यावरणात वास्तव्य करून चांगली झाली होती.
तसेच ती दरवर्षी गोव्यात येथे ती येथील निसर्गरम्य समुद्राचे दर्शन घेण्यासाठी. यासाठी काँग्रेस पक्ष गोव्याला कोळसाहब करण्यापासून रोखण्यासाठी जनतेच्या बरोबर उभा राहणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. नंतर राहुल गांधी याने मोंले, वेलसांव रेल्वे रुळावर जाऊन नागरिकांच्या घरांना दुपदरी मार्ग केल्यास कश्या प्रकारे धोका निर्माण होणार याची पाहणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.