Bharat Jodo Yatra Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील काँग्रेस नेते भ्रष्ट आणि बौद्धिक दिवाळखोर; भारत 'तोडो' यात्रा गोव्यात का आली नाही? BJP च्या वेर्णेकरांनी दिले उत्तर

Giriraj Pai Vernekar: चोडणकर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना वेर्णेकर यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कॉंग्रेसचे स्थानिक नेतृत्व बौद्धिक दिवाळखोर व भ्रष्ट असल्यानेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी गोवा भेटीवर आले नाहीत का, अशी विचारणा भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना केली आहे. याच कारणास्तव गांधी यांची भारत जोडो (तोडो) यात्रा गोव्यात आली नाही आणि गांधी लोकसभा निवडणूक प्रचारासाठी गोव्यात आले नव्हते का, असेही प्रश्‍न वेर्णेकर यांनी उपस्थित केले आहेत.

राज्यातील भाजप सरकारवरील भष्ट्राचाराचे आरोप वाढले आहेत. त्याचमुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्यात येण्याचे टाळले असा टोला चोडणकर यांनी काल लगावला होता. नड्डा हे भाजपच्या नव्या कार्यालय इमारत कोनशिला बसवण्‍यासाठी येणार होते मात्र गाभा समिती बैठक आणि केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमुळे त्यांंना दौरा रद्द करावा लागला होता. चोडणकर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना वेर्णेकर यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यांनी म्हटले आहे, की राहुल यांचे गोवा प्रेम हे निसर्ग सौंदर्य आणि विशिष्ट जातीच्या कुत्र्यांपुरतेच मर्यादीत आहे. त्यांना गोव्याविषयी कोणतेही प्रेम नाही आणि गोवा त्यांनी कनिष्ठ नेत्यांवर सोडून दिला आहे. या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी गोवा महत्वाचा आहे. त्यासाठी ते गोव्याला भेटीही देतात आणि विविध माध्यमांतून संवादही साधतात.

चोडणकरांनी पक्षात लक्ष द्यावं!

चोडणकर यांनी जनतेने कॉंग्रेसला २०१२ पासून सत्तेपासून का वंचित ठेवले आहे, याचा विचार करावा, असा सल्ला देऊन वेर्णेकर यांनी म्हटले, की चोडणकर यांनी भाजपवर तोंडसुख घेण्यात शक्ती खर्च घालण्यापेक्षा कॉंग्रेसच्या अंतर्गत कारभारावर लक्ष द्यावे. तेथे पुढील प्रदेशाध्यक्ष व पुढील विरोधी पक्षनेतेपदासाठी स्पर्धा आहे. ते प्रश्‍न सोडवण्यावर त्यांनी अधिक भर द्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मडगावात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग

Anupam Kher At IFFI: 'भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता'; अनुपम खेर अपयशाबद्दल म्हणाले की...

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT