Tofani Radha Goa Dainik Gomantak
गोवा

Radhika Dhamecha: "मी चालले" म्हणत वडिलांना केला शेवटचा फोन; गोवा ट्रिपनंतर इंस्टाग्रामच्या 'तुफानी राधा'ने संपवले आयुष्य

Tofani Radha Death: काही दिवसांपूर्वीच ती गोव्याहून परतली ज्यामुळे तिच्या अचानक आत्महत्या करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत

Akshata Chhatre

राजकोट: सोशल मीडियाच्या दुनियेने राधिका धामेचा नावाच्या इन्फ्लुएन्सरला गमावले आहे. 'तुफानी राधा' या नावाने प्रसिद्ध असलेल्या गुजराती इन्फ्लुएसरने राजकोट येथील निवासस्थानी आत्महत्या केली. २६ वर्षीय राधिकाच्या आत्महत्येमुळे तिच्या ४५,००० इंस्टाग्राम फॉलोअर्सना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच ती गोव्याहून परतली होती आणि तिच्या अचानक आत्महत्या करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत .

धामेचाची शेवटची ऑनलाइन पोस्ट एक इंस्टाग्राम रील होती, ज्यामध्ये तिने तिच्या आत्महत्येबद्दल सूचना दिल्याची शक्यता आहे. "आता ठरवण्याची वेळ आली आहे—पान उलटू की पुस्तक बंद करू?" तिच्या मृत्यूच्या आधी केलेल्या या पोस्टमुळे तिच्या मानसिक स्थितीबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

गुजरातमधील स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार धामेचा गोव्याहून परतल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली आहे, मात्र तिच्या गोव्यातील भेटीचे तपशील समोर आलेला नाहीत. तरीही सध्या गोवा भेटीचा तिच्या आत्महत्येच्या कारणाशी काही संबंध होता का, याबाबत चर्चा सुरू आहे.

या घटनेच्या काही दिवसांपूर्वी गोव्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि पर्यटन विभाग यांच्यात वाद झाला होता. काही इन्फ्लुएंसर गोव्यात येऊन राज्याची प्रतिमा डागाळत असल्याचा आरोप पर्यटन विभागाने केला होता. मात्र, धामेचाच्या गोवा भेटीचा या वादाशी कोणताही संबंध नाही.

राजकोट न्यूज या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, धामेचाने तिच्या वडिलांना फोन करून फक्त "मी चालले आहे," असे सांगितले आणि फोन कट केला. जेव्हा वडील घरी पोहोचले, तेव्हा ती मृत अवस्थेत आढळली. पोलीस निरीक्षक एन एन पटेल यांनी सांगितले की, धामेचाच्या मित्रांकडून सध्या आणखीन माहिती घेतली जात आहे आणि अंत्यसंस्कारानंतर तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जाईल.

कोण होती 'तुफानी राधा' ?

गुजरातमधील 'तुफानी राधा' उर्फ राधिका धामेचा घटस्फोटित होती आणि तिचा एक सहा वर्षांचा मुलगा देखील आहे. तिचे वैयक्तिक आयुष्य आणि ऑनलाइन आयुष्य यात मोठा फरक होता. तिच्या अचानक मृत्यूने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

नोकरी सोडली, अयोध्येचे राम मंदिर बनवले; 108 ठिकाणी भ्रमंतीची केली भीष्मप्रतिज्ञा, तुमकूरमधील रामभक्ताची कहाणी

Goa Live News: "जिथे बोलणे कर्तव्य आहे, तिथे गप्प राहणे हा गुन्हा"; न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांचे मार्मिक उद्गार

VIDEO: बाप के साये का असर होता है... रस्त्यावर खेळणी विकणाऱ्या वडिलांच्या पायाला धरुन झोपला चिमुकला; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT