Drowning Death Dainik Gomantak
गोवा

Drowning Death: मृत्यूचा 'ब्लॅक वीक'! केपेतील कालव्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू; आठवड्यात 8 बळी गेल्याने खळबळ

Quepem canal drowning deaths: बबरूमड्डी–केपे येथे कालव्यात बुडून इग्नेशियस शेरी फर्नांडिस (२२, फातोर्डा–मडगाव) आणि त्याचा मित्र हर्षित (२१, मूळ उत्तराखंड) या दोघांचा मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

केपे/पणजी: गेल्या रविवारी कुडचडे येथील दोन भावंडांचा बेतुल येथील नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी बबरूमड्डी–केपे येथे कालव्यात बुडून इग्नेशियस शेरी फर्नांडिस (२२, फातोर्डा–मडगाव) आणि त्याचा मित्र हर्षित (२१, मूळ उत्तराखंड) या दोघांचा मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांत या दोघांसह एकूण आठ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

कुशावती नदी तसेच जलस्रोत खात्याच्या कालव्यात रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेकजण आंघोळीसाठी येतात. इग्नेशियस आणि हर्षित हे दोघेही आंघोळीसाठीच बबरूमड्डी–केपे येथील मुख्य कालव्यात आले होते.

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचाही कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती केपे पोलिसांनी दिली. कालव्याच्या एका बाजूला दोन मृतदेह तरंगताना आढळल्याचे एका स्थानिकाच्या निदर्शनास आले. त्याने तत्काळ केपे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुडचडे अग्निशामक दलाला पाचारण केले.

आई–बहिणीला धक्का : इंग्रजेवाडा–फातोर्डा येथील इग्नेशियस शेरी फर्नांडिस हा होतकरू मुलगा होता. तो माजोर्डा येथील आयटीसी हॉटेलमध्ये कार्यरत होता. त्याचे वडील हयात नसून त्याच्या पश्चात आई व एक बहीण असा परिवार आहे. त्या दोघींची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी समजताच फातोर्डा परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. इग्नेशियसच्या मृत्यूमुळे त्याच्या आई व बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

गेल्या रविवारी बेतुल येथे बुडून भाऊ–बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी समुद्र, नद्या तसेच इतर पाणवठ्यांवरील धोकादायक ठिकाणी आंघोळीसाठी न उतरावे, अशा सूचना नागरिक व पर्यटकांना दिल्या होत्या. तसेच अशा ठिकाणी धोक्याचे फलक लावण्याचे निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, संबंधितांकडून या प्रक्रियेला गती मिळालेली नसल्याने नागरिक व पर्यटक अशा ठिकाणी आंघोळीसाठी जात असल्याचे दिसून येते.

इग्नेशियस व हर्षित यांचा ज्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला, तेथेही धोक्याचा कोणताही इशारा फलक नव्हता. फक्त पूल कमकुवत असल्याने त्यावरून वाहने नेऊ नयेत, असा फलक होता. उपनिरीक्षक दिगंबर बोंद्रे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, रविवारी तसेच इतर सुट्टीच्या दिवशी पोलिस अशा भागांत गस्त घालतात. धोकादायक ठिकाणी आंघोळीसाठी येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाते. मात्र, अशा ठिकाणी २४ तास बंदोबस्त ठेवणे शक्य नसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT