Crime News Dainik Gomantak
गोवा

Land Fraud: बनावट कागदपत्रे वापरून केली जमिनीची विक्री! 17 कोटींचा ढपला; केपे-बोरी येथील घटना, आठजणांविरोधात गुन्हा दाखल

Quepem Borim land fraud: सदर तक्रारींची सखोल चौकशी करण्‍यासाठी हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली आहे.

Sameer Panditrao

पणजी: केपे व बोरी येथील २ लाख ६० हजार चौरस मीटर जमिनीची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करण्‍यात आली असून तिची किंमत १७ कोटी रुपयांवर आहे. या प्रकरणी फोंडा व केपे पोलिस स्थानकात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्‍यानुसार फोंडा पोलिसांनी आठजणांविरोधात फसवणूक व बनवेगिरीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सदर तक्रारींची सखोल चौकशी करण्‍यासाठी हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली आहे, अशी माहिती तक्रारदार वासुदेव प्रेमानंद बोरकर व विमल वासुदेव बोरकर (रा. आल्‍तिनो-पणजी) यांनी दिली.

बोरकर म्‍हणाले की, बोरी व केपे येथे बोरकर कुटुंबीयांच्या सुमारे २८०० जमीन मालमत्ता आहेत. या मालमत्तेची यादी (इनव्हेंटरी) तसेच त्याची कुटुंबीयांमध्ये विभागणी केली नसतानाच बनावट दस्तऐवजांद्वारे केपे व बोरीतील सुमारे २ लाख ६० हजार चौरस मीटर जमिनीचे विक्री खत करून निबंधक कार्यालयात सादर करण्यात आले व त्याची विक्री करण्यात आली. दरम्‍यान, याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

दरम्‍यान, राज्‍यात अलीकडे जमीन हडप करण्‍याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. अनेकांना अटकही करण्‍यात आली आहे. आता या प्रकरणाने त्‍यात आणखी एकाने भर पडली आहे.

अशी आहेत संशयित आठजणांची नावे

या बनवेगिरीप्रकरणी वासुदेव बोरकर यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्‍यानुसार पोलिसांनी वेनीमाधव बोरकर, नवकर्णिका बोरकर, मोहन बोरकर, अनुराधा श्रीधर, माधवी नाडकर्णी, मोहनदास नाडकर्णी, सुषमा मथा व प्रदीप मथा या आठजणांविरोधात भारतीय दंड संहितेच्‍या कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ खाली गुन्हा नोंद केला आहे. या संशयितांनी तक्रारदाराच्या कुटुंबीयांच्या नावे बोगस पॉवर ऑफ ॲटर्नी तयार केली व ती अधिकृत म्हणून फोंडा उपनिबंधक कार्यालयात सादर केली. त्यानंतर मालमत्तेची विक्री खत करून ती विकल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

केपे प्रकरणातही आठ संशयितांची नावे

१. या मालमत्तेची विक्री बनावट दस्तावेजांद्वारे २०१३ पासून करण्‍यात आली. मात्र त्याबाबतची माहिती २०२३ मध्ये उजेडात आली, असे तक्रारदार वासुदेव बोरकर यांनी सांगितले.

२. अनेक मालमत्तांची विक्री झाली असल्याने यासंदर्भात आणखी एक तक्रार फोंडा पोलिसांत देण्यात आली आहे. यापूर्वीच केपे पोलिस स्थानकात नागवे येथील मालमत्ता विक्रीप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

३. त्‍यात दामोदर बोरकर, शैला बोरकर, अशोक बोरकर, अनुराधा बोरकर, गजानंद शेणवी बोरकर, संगीता बोरकर, गिवाजी ऊर्फ जिवाजी शेणवी बोरकर व सुनीता शेणवी बोरकर यांचा समावेश आहे.

४. यासंदर्भातही केपे पोलिस स्थानकात लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असल्याचे

वासुदेव बोरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT