Quelossim Diwali Bazar Dainik Gomantak
गोवा

Quelossim: समुद्र किनाऱ्यावर भरला ‘दिवाळी बाजार’! केळशी पंचायतीचा अभिनव उपक्रम; स्थानिकांसह पर्यटकांनीही घेतला लाभ

Quelossim Diwali Bazar: स्थानिक महिला स्वयंसेवी गटांना चांगली संधी मिळवून देण्यासाठी एका अभिनव अशा उपक्रमाची सुरवात केली असून केळशी समुद्र किनाऱ्यावर दिवाळी बाजाराचे आयोजन केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: केळशी पंचायतीने स्थानिक महिला स्वयंसेवी गटांना चांगली संधी मिळवून देण्यासाठी एका अभिनव अशा उपक्रमाची सुरवात केली असून केळशी समुद्र किनाऱ्यावर दिवाळी बाजाराचे आयोजन केले आहे. या दिवाळी बाजाराचे उद्‍घाटन केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना सरपंच वाझ यांनी सांगितले, की महिला या कुटुंबाचा अत्यंत महत्वाचा घटक असतात. महिलांकडे चांगली प्रतिभा, कौशल्य असते. मात्र त्यांना संधी मिळत नसते. केळशी पंचायती तर्फे स्थानिक पाच महिला स्वयंसेवी गटांच्या सहकार्याने या दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यांची उत्पादने विक्रीची संधी पंचायतीतर्फे देण्यात येत आहे. या किनाऱ्यावर हजारो पर्यंटक असतात, शिवाय स्थानिक लोकही असतात. त्यामुळे त्यांच्या उत्पादनाला मागणी मिळणार आहे.

शिवाय हा बाजार दर शुक्रवार, शनिवार व रविवारी भरविण्यात येणार आहे, नाताळच्या वेळीही या महिलांना फायदा मिळणार आहे, असे वाझ यांनी सांगितले. या स्वयंसेवी महिला गटांतील प्रतिनिधींनी सरपंच डिक्सन वाझ यांचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT