Goa Drugs Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'स्कॅन करा, ड्रग्ज मिळवा'! पणजी पोलिस स्थानकाजवळ पोस्टर; माफिया करत आहेत डिजिटल तस्करी ?

Goa Drugs: गुन्हेगार अमलीपदार्थांची विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधून काढत असतात आणि त्यात अजून एक नवीन पद्धत समोर आल्याची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे.

Sameer Panditrao

पणजी: गुन्हेगार अमलीपदार्थांची विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधून काढत असतात आणि त्यात अजून एक नवीन पद्धत समोर आल्याची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. गोव्यातील अमलीपदार्थांच्या तस्करीत नवा व अधिक आधुनिक पद्धतींचा वापर सुरू झाल्याचे समोर आले आहे.

पणजी पोलिस स्थानक व उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ड्रग्जशी संबंधित ‘क्यूआर कोड’ सापडल्याने प्रशासनात मात्र खळबळ माजली आहे. या क्यूआर कोडला स्कॅन केल्यानंतर ‘एमडीएमए’ व ‘कोकेन’सारख्या धोकादायक अमलीपदार्थांची नावे दिसून आली.

यामुळे ड्रग्ज माफियांनी आता नवा ‘डिजिटल प्रचार’ सुरू केला असल्याची भीती व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी ‘क्यूआर कोड’ लावून संभाव्य ग्राहकांना किंवा डिलर्सना थेट संदेश, किमती व इतर माहिती देण्याचा हा नवा मार्ग असू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या पद्धतीमुळे प्रत्यक्ष संपर्काची गरज राहत नाही व पोलिसांच्या नजरेतून बचाव देखील होऊ शकतो. विशेष म्हणजे हा कोड पोलिस स्थानकाबाहेरच लावला गेला असल्याने तस्करांना कायद्याची भीती उरलेली नाही आणि हा कायदा व सुव्यवस्थेला थेट आव्हान दिल्याचे मानले जात आहे.

गोव्यातील ड्रग्ज तस्करीची समस्या नवी नाही. समुद्रकिनाऱ्यांवर व पर्यटन पट्ट्यांत याआधी अनेकदा कारवाई झाली असली तरी हे जाळे पूर्णपणे संपुष्टात आलेले नाही, हे या घटनेतून स्पष्ट झाले. पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्थेला या अमलीपदार्थांच्या तस्करीमुळे मोठा धोका निर्माण होत असून सुंदर पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्याची प्रतिमा ‘ड्रग्ज हब’ म्हणून बदनाम होण्याचा धोका व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AIच्या मदतीने गोवा होणार 'स्मार्ट', बनणार देशातील सर्वात 'डिजिटल' राज्य; रोहन खवंटेंची मोठी घोषणा

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, स्टार फलंदाजाच्या प्रकृतीबाबत चिंताजनक अपडेट

अखेर पाकिस्तानने केलं मान्य... ऑपरेशन सिंदूरमध्ये झालं मोठं नुकसान; 138 जवानांना दिला पुरस्कार

Goa Shivsena: विधानसभेची तयारी? एकनाथ शिंदेची शिवसेना गोव्यात करणार महत्वाची घोषणा

Goa News Live Update: साकवार- बोरी येथे पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक

SCROLL FOR NEXT