Goans returning after Qatar airspace reopens Dainik Gomantak
गोवा

Qatar Airspace: गल्‍फमधील गोमंतकीयांचा जीव भांड्यात! कतारचे हवाई क्षेत्र खुले; रद्द केलेला 'सांजाव' होणार साजरा

Qatar Airspace Reopening: युद्धात अमेरिकेने हस्‍तक्षेप केल्‍याच्‍या निषेधार्थ इराणने अमेरिकन तळावर क्षेपणास्‍त्र हल्‍ला केल्‍यानंतर कतारने आपले हवाई क्षेत्र विमान उड्डाणासाठी बंद करण्‍याचा निर्णय घेतला होता.

Sameer Panditrao

मडगाव: इराण-इस्राईल युद्धात अमेरिकेने हस्‍तक्षेप केल्‍याच्‍या निषेधार्थ इराणने कतारमधील अमेरिकन तळावर क्षेपणास्‍त्र हल्‍ला केल्‍यानंतर कतारने आपले हवाई क्षेत्र विमान उड्डाणासाठी बंद करण्‍याचा निर्णय घेतला होता. त्‍यामुळे आखातात काम करणाऱ्या गोमंतकीयांच्‍या मनात धडकी भरली होती. मात्र कतारने आपले हवाई क्षेत्र उड्डाणासाठी पुन्‍हा खुले केल्‍याने गोमंतकीयांनी सुटकेचा स्‍वास सोडला.

आखातातून चार विमान कंपन्‍यांची विमाने गोव्‍यात येत असून त्‍यात कतार एअरवेज (मोपा-दोहा), एअर अरेबिया (मोपा-शारजा), गल्‍फ एअर (दाबोळी-बहारीन) आणि एअर इंडिया (दाबोळी-दुबई) या कंपन्‍यांचा समावेश होतो.

मात्र कतारसह कुवेट-बहारीन आणि युएई या सर्वांनी आपली हवाई क्षेत्रे उड्डाणासाठी बंद करण्‍याचा निर्णय घेतल्‍याने आखातात जाण्‍या-येण्‍याचा मार्ग बंद झाला होता. मात्र काल रात्री १२ वाजता कतारच्‍या नागरी उड्डाण मंडळाने हवाईक्षेत्र सुरू करण्‍याचा निर्णय जारी केला.

पूर्वी गोव्‍यात पत्रकार म्‍हणून काम करणारे पण सध्‍या कतारमध्‍ये पत्रकारिता करणारे आर्मस्‍ट्राँग वाझ यांच्‍याकडून कतारच्‍या स्‍थितीचा अंदाज घेण्‍याचा प्रयत्‍न केला असता, ज्‍यावेळी हा हल्‍ला झाला त्‍यावेळी सर्वजण भयभीत झाले होते. मात्र आता स्‍थिती बऱ्यापैकी नियंत्रणाखाली आहे. कतारमध्‍ये असलेल्‍या गोमंतकीयांनी शुक्रवार २७ जून रोजी सांज्‍यांवचा उत्‍सव ठेवला होता, पण स्‍थिती तणावपूर्ण असल्‍याने तो रद्द करण्‍याचा निर्णय

घेतला होता. मात्र आता स्‍थिती पुन्‍हा सर्वसाधारण झाल्‍याने हा उत्‍सव शुक्रवारी पुन्‍हा एकदा साजरा करण्‍याची तयारी सुरू झाली आहे, अशी माहिती त्‍यांनी दिली. बहारीननेही आपले हवाई क्षेत्र खुले केले आहे, अशी माहिती त्‍यांनी दिली.

वाझ कतारमध्‍ये ज्‍या ठिकाणी राहतात ती जागा ज्‍या अमेरिकन तळावर हल्‍ला झाला त्‍या तळापासून सुमारे २५ ते ३० कि.मी. दूर आहे. मात्र या क्षेपणास्‍त्र हल्‍ल्‍याचे आवाज आम्‍हाला स्‍पष्‍टपणे ऐकू येत होते. त्‍यामुळे काहीजण घाबरून घराबाहेर आले. त्‍यावेळी वर आकाशात ड्रोन शो चालू आहे असे वाटावे अशी स्‍थिती दिसत होती, अशी माहिती त्‍यांनी दिली.

एनआरआय आयुक्‍तालयाकडे कुणाकडूनही संपर्क नाही

आखातात सध्‍या तणावपूर्ण स्‍थिती निर्माण झाल्‍याने गोव्‍यातील एनआरआय आयुक्तालयाकडे कुणीही संपर्क केला आहे का असे एनआरआय आयुक्‍त नरेंद्र सावईकर यांना विचारले असता, अजून तरी आमच्‍याकडे कुणीही मदतीसाठी संपर्क केलेला नाही असे त्‍यांनी सांगितले. सध्‍या मी माझ्‍या कार्यालयाकडून संपूर्ण माहिती घेत आहे. मदतीची गरज पडल्‍यास आम्‍ही ती देण्‍याचा प्रयत्‍न करू अशी माहिती त्‍यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: '..देवाजीच्या दारी आज रंगला अभंग'! पंढरपूरचे दाम्पत्य गोव्यात दाखल; 25 वर्षांपासून देतेय गणेशभक्तांना सेवा

Goa Assmbly Live: पार्से पंचायत क्षेत्रात 30 लाख खर्च करून दोन वीज ट्रासफॉर्मर उभारण्यात आले

Mopa Airport: मोपावर वर्दळ वाढली! आठवड्याला 714 विमानांची ये-जा; मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती

Weekly Horoscope: छोटीशी मेहनतच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल 'या' राशींसाठी हा आठवडा ठरणार खास; जाणून घ्या तुमचे भविष्य

Chimbel: '13 घरे नकाशातून केली गायब'! चिंबलवासीयांचा आरोप; 4.5 लाख चौमी जमीन हडप करण्‍याचा डाव असल्याचा दावा

SCROLL FOR NEXT