पाणी आणि वीज बील ही महिन्याला भरली जातात. प्रत्येक महिन्याला या बीलांचा हिशोब ठेवला जातो आणि मगच बाकीच्या खर्चाचे नियोजन केले जाते. पण, समजा नऊ महिने बील आलेच नाही अचानक एक दिवस सर्वच बीच एकमद आले तर तुमची तरांबळ उडणारे हे निश्चित आहे. अशीच एक घटना फोंडा येथून समोर आली आहे.
फोंडा येथील एका रहिवाशी गृहप्रकल्पाला तब्बल नऊ महिने पाण्याचे बील आलेच नाही. पण, नऊ महिन्यानंतर या सोसयटीला 63 हजार 928 रूपयांचे बील आहे. या सोसायटीत एकूण 16 फ्लॅट असून, त्या सर्वांना विभागून या बीलाची रक्कम जाणार आहे. PWD खात्याने तब्बल नऊ महिन्यानंतर बील दिल्यानंतर गृहप्रकल्पातील रहिवाशी नाराज झाले आहेत.
नऊ महिन्यानंतर दिलेल्या बीलाची रक्कम खूप मोठी आहे. बील भागवताना रहिवाशांना मोठी रक्कमा द्यावी लागणार आहे. असे येथील रहिवाशांनी म्हटले आहे.
PWD खात्याने पाणी बीले महिन्यालाच द्यावीत, जेणेकरून रहिवाशांना बील देणे सोपे आणि कमी खर्चाचे होईल. अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
63 हजार 928 रूपयांचे बील भागवताना येथील प्रत्येकाच्या वाट्याला चार हजार रूपये येणार आहेत. तर, यापूर्वी महिन्याला येणाऱ्या बिलाचा वाटा दोनशे ते तीनशे रूपये होता. त्यामुळे खात्याने महिन्यालाच पाणी बील द्यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.