Margao: कोलमोरोड येथील झेवियरच्या मूर्तीची तोडफोड, क्रॉसचीही मोडतोड

रात्री नऊच्या सुमारास ख्रिस्ती बांधव प्रार्थना करण्यासाठी याठिकाणी आले असता, त्यांच्या हा सगळा प्रकार लक्षात आला.
Colmorod, Margao
Colmorod, Margao
Published on
Updated on

Colmorod, Margao: कोलमोरोड, मडगाव येथील झेवियरच्या मूर्तीची तोडफोड करून क्रॉसची देखील मोडतोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी सायंकाळी 6.30 ते 9.00 च्या सुमारास ही घटना घडली. रात्री नऊच्या सुमारास ख्रिस्ती बांधव प्रार्थना करण्यासाठी याठिकाणी आले असता, त्यांच्या हा सगळा प्रकार लक्षात आला.

(St. Xavier's Statuette found desecrated at Colmorod, Margao)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी 6.30 ते 9.00 च्या सुमारास कोणी अज्ञात इसमाने येथील झेवियरच्या मूर्ती व क्रॉसची मोडतोड केली. रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला. याबाबत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धार्मिक वास्तू व मूर्तीची तोडफोड करत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, तोडफोड केल्यानंतर संबधित इतरत्र फेकून दिल्याचे पोलिसांना आढळून आले.

Colmorod, Margao
Zuari Bridge: नव्या झुआरी पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या, सापडला नाही मृतदेह

कोलमोरोड येथील कपेल द सांताक्रुझ समितीचे अध्यक्ष लिगोरिओ बर्रेटो यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना माहिती दिली व तक्रार दाखल केली. दरम्यान, घटना घडल्यानंतर पालिकेचे नगराध्यक्ष किंवा परिसरातील नगरसेवक यापैकी कुणीच घटनास्थळी भेट दिली नाही. असे स्थानिकांनी म्हटले आहे.

पोलिसांनी घटनेची दखल घेत तपासाला सुरूवात केली असून, घटनस्थळी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि येथील हाताचे ठसे देखील घेण्यात आले आहेत. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com