Yuri Alemao | Vijai Sardessai  Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: "सरकार कला अकादमीचं मृत्युपत्र तयार करतंय का"? आलेमाव-सरदेसाईंची 'पुरुष' प्रयोगावरून आक्रमक टीका

Purush Natak Goa: विरोधी पक्ष नेत्यांनी देखील 'पुरुष' या नाटकाच्या प्रकरणावरून सरकारवर तलवार उचलली आहे

Akshata Chhatre

पणजी: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, वक्ते शरद पोंक्षे आणि नाटक समूह 'पुरुष' या नाटकाच्या निमित्ताने सध्या गोवा दौऱ्यावर आहे. रविवार (दि.१३ एप्रिल) रोजी कला अकादमी पणजी येथे नाटकाचा पहिला अंक सुरु असतानाच लाईट्स फ्लिकर होऊ लागल्याने पहिला अंक काही वेळासाठी थांबवावा लागला.

यानंतर नाटकाचे निर्माते आणि प्रमुख भूमिकेत असलेल्या शरद पोंक्षे यांनी स्वतः समोर येत माफी मागितली आणि नाटक काही काळ थांबवत असल्याची विनंती केली. सध्या कलाप्रेमींकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय आणि आता विरोधी पक्ष नेत्यांनी देखील 'पुरुष' या नाटकाच्या प्रकरणावरून सरकारवर टीका केली.

"गोव्यासाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब"

कला अकादमीतील वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे मराठी नाटक 'पुरुष' चा प्रयोग थांबवावा लागला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आहे.

"कला अकादमीच्या नूतनीकरणानंतरही पायाभूत सुविधा आणि त्रुटी कायम राहिल्याने गोव्यातील कलाकारांनी अनेकदा चिंता व्यक्त केली होती, पण प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कला आणि नाट्यभूमी म्हणून असलेल्या गोव्यासाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. सरकार असं वागून कला अकादमीचे 'मृत्युपत्र' लिहित आहे का? "असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

"शरद पोंक्षे यांच्या आरोपांकडेही दुर्लक्ष जाणार नाही ना?"

या प्रकरणावरुन गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी देखील सरकारला धारेवर धरलंय. "सरकार आता तरी याची जबाबदारी घेऊन कारवाई करेल का"? असा प्रश्न सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.

दरवेळीप्रमाणे गोव्यातील तियात्रकार आणि कार्यकर्त्यांनी वारंवार केलेल्या याच प्रकारच्या निरीक्षणांप्रमाणे शरद पोंक्षे यांच्या आरोपांकडेही दुर्लक्ष केले जाणार नाही ना? अशी भीती सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. कला अकादमीतील ही सततची दुर्दशा गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी नुकसानकारक आहे, असेही सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT