Purple Fest In Goa  Dainik Gomantak
गोवा

Purple Fest Goa: पर्पल फेस्ट’ची दिमाखात सांगता; डोळसजनांना ‘दिव्यांग’ अनुभूती

Goa: ''पर्पल फेस्ट''चा अंतिम व तिसरा दिवस हा क्रीडा स्पर्धांनी गाजवला.

दैनिक गोमन्तक

Purple Fest Goa: राजधानी पणजीत गेले तीन दिवस सुरू असलेल्या ‘पर्पल फेस्ट’ची काल दिमाखात सांगता झाली. वैविध्यतेचा सोहळा ठरलेल्या ''पर्पल फेस्ट''चा अंतिम व तिसरा दिवस हा क्रीडा स्पर्धांनी गाजवला. विविध कार्यशाळा, सांस्कृतिक उपक्रम आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा महोत्सव संस्मरणीय ठरला.

आयनॉक्स कोर्ट यार्डवर झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, आमदार दिगंबर कामत, भाजप राज्य प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सचिव सुभाष चंद्र, दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सचिव ताहा हाजिक यांच्या उपस्थित होते.

समारोप समारंभात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, हा महोत्सवाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या वतीने पणजी शहर दिव्यांगांसाठी ये-जा करण्याकरता सुलभ केले आहे.

यापुढे संपूर्ण राज्य दिव्यांगांसाठी सुलभ करण्यावर आमचा प्रयत्न असेल. या महोत्सवासाठीचा 50 टक्के खर्च केंद्र सरकार देणार आहे.

यापुढेही आम्ही ‘फिल्म फेस्टिव्हल’च्या धर्तीवर हा उत्सव राज्यात करू. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने भरलेल्या जागृती मेळाव्याला भेट दिली. सर्व स्वयंसेवी संस्था विकलांग व्यक्तींच्या पालकांना मदत करत होते. ही सकारात्मकता, सर्वसमावेशकतेचे दृश्‍य खूप भावले.

केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले, आता समाज विकलांग व्यक्तीला सहजपणे स्वीकारू लागला आहे. या व्यक्तींनाही सन्मान आणि संधी मिळत आहेत. या बदललेल्या चित्राचे ‘पर्पल फेस्ट’ हे एक ठळक उदाहरण आहे.

समाज कल्याणमंत्री फळदेसाई म्हणाले, या महोत्सवात निमंत्रित मान्यवर वक्त्यांनी विकलांग व्यक्तींना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी प्रोत्साहित केले. आम्ही त्यांना सर्वोत्कृष्ट शैक्षणिक सुविधा, सुरक्षितता, संरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. धोरणात्मक दृष्टिकोनातून चांगले कायदे आणण्याबाबत सरकारचा सकारात्मक प्रयत्न आहे.

दिवसभरातील घडामोडी

  • ‘पर्पल डायलॉग’च्या निमित्ताने पायाभूत सुविधांमधील सुलभता, चेतना विकलांगता, मला जाणून घ्या, आमच्यानंतर काय?, रक्तातील कमतरता, दिव्यांग सक्रियता आणि समाज माध्यमे, दिव्यांग व्यक्तींचे लैंगिक मुद्दे आदी विषयांवरील चर्चासत्रांच्या माध्यमातून विशेष चर्चा झाली. यात मान्यवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

  • दिव्यांगता, लिंग आणि लैंगिकता या चर्चासत्रामध्ये सहभागी मान्यवर वक्त्यांनी दिव्यांग व्यक्तींचे अधिकार आणि समावेशकतेचे धोरण, यावर विचार मांडले. दिव्यांग लोकांसाठी ध्येय साध्य करण्यासाठी सोशल मीडिया हे कशा प्रकारे उपयुक्त साधन ठरू शकते, याबाबतही ऊहापोह करण्यात आला.

पर्पल थिंक टँक

जेव्हा उदार वृत्तीची मने प्रामाणिकपणे संवाद साधतात, तेव्हा ते सुरक्षित जागा आणि स्वागतार्ह वातावरण यांची निर्मिती करतात. पर्पल थिंक टँक उपक्रमातही विविध व्याख्याने आणि परिसंवादांच्या मालिका पार पडल्या.

यामध्ये सेतू संस्थेतील विकासात्मक बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदिता डिसोझा आणि नेहा त्रिवेदी यांनी भारत देशासाठी उपयुक्त ठरू शकेल अशा समावेशक शैक्षणिक पद्धतीवर मार्गदर्शन केले.

दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी समावेशक शैक्षणिक पद्धती, विविध प्रकारच्या दिव्यांगांसाठी रोजगार धोरणाची गरज, समान संधी आणि उपजीविका विकास या मुद्द्यांवरही त्यांनी उत्तम विवेचन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT