Purple Fest|Book  
गोवा

Purple Fest: दिव्यांग आहे म्हणून रडायचं नाही... भिडायचं!

दृष्टिहीन असूनही लिहिले पुस्तक : सय्यद हुसेन यांची यशोगाथा

दैनिक गोमन्तक

Purple Fest: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख असते. प्रत्येकाला जीवनात यश प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. परंतु आपण ज्यावेळी मनाने खचतो, त्यावेळी संपतो. आपण दिव्यांग आहोत म्हणून रडत बसायचं नाही तर संकटाला भिडायचं.

संकटालाही हरवता आले पाहिजे, असे धीरोदात्त उदगार दिव्यांग लेखक सय्यद शबाब हुसेन यांनी ‘गोमन्तक’शी संवाद साधताना काढले.

‘पर्पल फेस्ट’मध्ये सहभागी होण्यासाठी ते खास लखनऊहून गोव्यात आले होते. हुसेन यांना दृष्टी नाही. त्यांनी इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

हुसेन यांनी आपल्यासारख्याच इतर 11 दृष्टीहीन दिव्यांगांच्या यशोगाथा त्यांनी ‘बिटींग ब्लाईंडनेस’ या इंग्रजी पुस्तकात मांडल्या आहेत. दिव्यांगत्वावर मात करत त्यांनी कशा प्रकारे यश मिळवले, याच्या प्रेरणादायी कथा त्यात लिहिल्या आहेत. हे पुस्तक त्यांनी विशिष्ट ‘ॲप’च्या साहाय्याने लिहिले आहे.

याविषयी हुसेन म्हणाले, मी बोलेन तसे त्या ‘ॲप’मध्ये टाईप व्हायचे. टाईप झालेले शब्द पुन्हा ‘ॲप’द्वारे उच्चारले जायचे. त्यावरून जर चुकीचा शब्द टाईप झाला असेल तर तो मी सुधारायचो.

हे पुस्तक ब्रेल लिपीत देखील प्रकाशित केले आहे, जेणेकरून माझ्यासारख्या इतर दिव्यांगांनाही याद्वारे प्रेरणा मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.

अशा कार्यक्रमांची नितांत गरज

‘पर्पल फेस्ट’विषयी सय्यद हुसेन म्हणाले, दिव्यांगांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे आवश्‍यक आहेत. त्यामुळे दिव्यांग एकत्र येतात. त्यांच्या प्रश्‍नांवर, समस्यांवर चर्चा होते.

समस्या कशा प्रकारे सोडवता येतील, यावर उपाय सुचविले जातात. दिव्यांगांनाही प्रोत्साहन मिळते. त्यामुळे अशा कार्यक्रमांची दिव्यांगांना नितांत गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पेडणे गोळीबार घटनेला मोठे वळण! तेरेखोल नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी 7 जणांना अटक

Viral Video: अंगावर चिखल उडवणाऱ्या कारचालकाची तरुणीनं मोडली चांगलीच खोड; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'भावाने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला...'

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

Vellim Church Attack: 13 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल! वेळ्ळी चर्च हल्ला प्रकरणातील सर्व 22 संशयितांची निर्दोष मुक्तता; मडगाव कोर्टाचा मोठा निर्णय

Rohit Arya Shot Dead : मुंबईतील RA स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य गोळीबारात ठार

SCROLL FOR NEXT