Club Fight 
गोवा

Morjim Goa: पुणेकर पर्यटकांना गोव्यातील क्लबमध्ये लाथाबुक्यांनी मारहाण? एन्ट्री पासवरुन हमरीतुमरी, परस्परविरोधी गुन्हा

Brawl at Morjim club: पुणेकर पर्यटकांना वैध प्रवेशासाठी पास आणि बँडची विचारणा करण्यात आली. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला.

Pramod Yadav

मोरजी: पुण्यातून गोव्यात आलेल्या पर्यटकांना वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोरजी येथील क्लबमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एन्ट्री पासवरुन पर्यटक आणि क्लब मॅनेजर व कर्मचारी यांच्या वाद झाला. वादाचे रुपांतर झटापटीत झाले, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ०१ जानेवारी रोजी हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मांद्रे पोलिसांनी याप्रकरणी सातजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये क्लबचा मालक, मॅनेजर येथील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुणेकर पर्यटकांना वैध प्रवेशासाठी पास आणि बँडची विचारणा करण्यात आली. यावरुन क्लब कर्मचारी आणि पर्यटक यांच्यात वाद झाला.

पर्यटकांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, क्लब मालक, मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी पर्यटकांना लाथाबुक्यांसह बांबूने मारहण केली. यात पर्यटकांना गंभीर जखम झाली, असेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, क्लब मालकाने देखील याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

पर्यटकांनी बेकादेशीरपणे रेस्टॉरंट कम क्लबमध्ये प्रवेश केला. त्यांना एन्ट्रीपास आणि बँडची विचारणा केली असता अश्लील शिवीगाळ केल्याचे क्लब मालकाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT