Illegal Paragliding In Goa Dainik Gomantak
गोवा

Illegal Paragliding: पॅराग्लायडिंगसाठी पुण्यातून गोव्यात जाणं भोवलं; पोलिसांनी शिकवला धडा

Illegal Paragliding In Goa: पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत, विनापरवाना सुरु असलेले पॅराग्लायडिंग बंद पाडले.

Pramod Yadav

पेडणे: केरी येथे पॅराग्लायडिंग करताना दोघांचा मृत्यू झाल्याची घटना जानेवारीत उघडकीस आली होती. या घटनेनंतर राज्यात सुरु असलेल्या पॅराग्लायडिंगवर पर्यटन खात्याने तात्पुरती बंदी घातली आहे. दरम्यान, बंदी असताना देखील पॅराग्लायडिंग करणाऱ्या महाराष्ट्रातील पर्यटकांवर गोवा पोलिसांनी शनिवारी (२२ मार्च) कारवाई केली आहे.

Illegal Paragliding In Goa

किनारी पोलिस निरीक्षक विक्रम नाईक आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे. केरी येथे आठजण अवैधपणे पॅराग्लायडिंग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत, विनापरवाना सुरु असलेले पॅराग्लायडिंग बंद पाडले. संबधित लोक पॅराग्लायडिंगसाठी पुणे व महाराष्ट्रातील इतर भागातून गोव्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, जानेवारीत केरी येथे पॅराग्लायडिंग करताना दोर तुटल्याने पुण्यातील एक तरुणी आणि पायलटचा मृत्यू झाला होता. चौकशीदरम्यान अपघात झाला त्या परिसरात अवैधपणे पॅराग्लायडिंग व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले होते. पर्यटन खात्याने याची गंभीर दखल घेत राज्यातील पॅराग्लायडिंग व्यवसायावर तात्पुरती बंदी घातलीय.

केरी येथे पॅराग्लायडिंग करताना अचानक दोरी तुटल्यामुळे पुणे येथील पर्यटक युवती शिवानी दाभळे (वय २६ वर्षे) आणि त्याच पॅराग्लायडरचा पायलट सुमन नेपाळी (वय २५ वर्षे) हे दोघे ठार झाले होते. या घटनेनंतर हरमल तसेच केरी भागात बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंगचा व्यवसाय सुरु असल्याचे उघडकीस आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT