Shigmotsav  Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात सार्वजनिक शिगमोत्सव उत्साहात!

दर्शकांची मोठी उपस्थिती, चित्ररथांबरोबरच रोमटामेळ, वेशभूषा स्पर्धकांची रेलचेल

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समितीतर्फे राज्य सरकारच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणारा वार्षिक शिगमोत्सवाला आज (शनिवारी) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ओस्सय...ओस्सयच्या गजरात आणि ढोलताशांच्या तडतडाटात फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या हस्ते तसेच प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, अंत्रुज शिगमोत्सव समितीचे उपाध्यक्ष अशोक नाईक तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत तिस्क - फोंडा येथील श्री महादेव घुमटीला श्रीफळ अर्पण करून या शिगमोत्सवाला सुरुवात झाली.

यावेळी रवी नाईक यांनी गेल्या चाळीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शिगमोत्सवाला आज व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून सर्वांच्या एकतेसाठी सुरू झालेल्या या सार्वजनिक शिमगोत्सवात सर्वांचा सहभाग असायला हवा, असे मत व्यक्त केले.

आमदार गोविंद गावडे यांनी रवी नाईक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक शिगमोत्सवातून एकतेचे दर्शन घडत असून प्रत्येकाने मतभेद विसरून या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन केले. दर्शकांची मोठी संख्या यावेळी दिसली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sheikh Hasina: वडिलांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्याच मुलीला त्याच देशात फाशीची शिक्षा का ठोठावली जातेय? जाणून घ्या तीन कारणं

VIDEO: "सह्याद्रीत जन्म, सह्याद्रीतच राहणार...", 'ओंकार हत्ती'ला वनतारात हलवण्याच्या निर्णयाला सिंधुदुर्गवासियांचा तीव्र विरोध

Pooja Naik: "जर खरोखर निर्दोष असाल तर कुटुंबासह शपथ घ्या!", पालेकरांचे वीजमंत्र्यांना नार्को टेस्टचे आव्हान

Goa Crime: मडगावात खळबळ! खारेबांध परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, हिंसाचार प्रकरणात कोर्टानं ठरवलं दोषी

SCROLL FOR NEXT