The public in Goa has the lowest income and the highest expenditure Dainik Gomantak
गोवा

Goa Updates: 'आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या'

या महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य गरीब तसेच मध्यमवर्गीयांचा बजेट ढासळला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गेल्या काही दिवसात राज्यात इंधनाचे दर वाढल्याने खाद्यतेलाच्या दरांचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरात देखील वाढ झाली आहे. ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’ अशी अवस्था सद्यस्थितीत दिसून येत आहे. या महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य गरीब तसेच मध्यमवर्गीयांचा बजेट ढासळला आहे.

गेल्या महिन्यापासून कांदा, टोमॅटो व बटाट्याचे दर स्थिर आहेत मात्र पालेभाज्यांच्या दरात चढ-उतार चालू आहे. लिंबू गेल्या आठवड्यात पन्नास रुपयांना 10 दिले जात होते, मात्र आज पणजी मार्केट येथे 50 रुपयांना 8 लिंबू विकले जात आहेत. हिरवी मिर्चीदेखील झोंबत असून 120 ते 160 रू प्रती किलो दराने विकली जात आहे. भाजीपाला, मासळी, खाद्यतेलांच्या किंमतीत वाढ झाल्याने गोरगरीब जनतेला आपला उदरनिर्वाह करणे कठीण जात आहे.

खाद्यतेलांच्या दरांचा भडका

दर प्रती किलो

कांदा- 30

बटाटा- 30

टोमॅटो- 30

गवार - 50

कोबी- 40

गाजर - 60-80

बिन्स - 65- 70

भेंडी- 60

शिमला मिर्ची - 80

पाले भाजी प्रती जुडी

मेथी- 20 (५० ला तीन)

लालभाजी - 10

कांदापात - 20

मुळा- 20

पालक - 10

लिंबू - 50 रुपयांना 8

कडधान्याचे दर प्रति किलो तुरडाळ - 111 मूगडाळ- 94 मसूर डाळ - 104 हिरवे वाटाणे- 140 पांढरे वाटाणे - 100 काबुली चणा- 115 शेंगदाणा - 140 सनफ्लॉवर तेल - 225-250 पामोलिन तेल- 180-215

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SAFF Championship: पाकिस्तानविना गोव्यात रंगणार 'सॅफ फुटबॉल स्पर्धा'; यजमान भारत, गतविजेत्या बांगलादेशसह एकूण सहा महिला संघांत चुरस

Omkar Elephant: 'ओंकार' पोचला उगाडे - सिंधुदुर्गात... सीमोल्लंघन सुरूच; पेडणे वन कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा

8th Pay Commission: पगारवाढीचा 'सुपर धमाका'! रिटायरमेंट फंड आणि एरियरबाबत मोठी अपडेट; बेसिक सॅलरी किती वाढणार?

SCROLL FOR NEXT