MLA Deviya Rane Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : ग्रामीण भागातील मुलांना सोयीसुविधांचा पुरवठा : आमदार डाॅ. दिव्या राणे

Valpoi News : ठाणे विद्यालयाच्या इमारत दुरुस्ती, संरक्षक कुंपणाच्या कामाचा शुभारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News : वाळपई, आज मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन खूप महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील मुलांना आता चांगल्या प्रकारची सुविधा प्राप्त होत आहे. त्यामुळे या इमारतीच्या माध्यमातून मुलांनी आपला विकास करताना गावाचे, शाळेचे नाव उज्ज्वल केले पाहिजे, असे प्रतिपादन पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी केले.

ठाणे येथील सरकारी माध्यमिक विद्यालय ठाणे यांच्या इमारत दुरुस्ती व संरक्षक कुंपणाच्या पायाभरणी कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, ठाणे सरपंच सरिता गावकर, उपसरपंच तनया गावकर, मुख्याध्यापक काशिनाथ नाईक, शिक्षक गणेश गावडे, फटगो गावकर, कंत्राटदार रियाज खान, सिध्देश साळुंखे, लाड, पंच सुरेश आयकर, नीलेश परवार, अनुष्का गावकर, सुचिता गावकर,

सोनिया गावकर, सुभाष गावडे, विनायक गावस, सर्वेश गावकर आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संरक्षक कुंपणाचे व इमारत दुरुस्तीकामाचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला.

ठाणेसारख्या ग्रामीण भागातील सरकारी माध्यमिक विद्यालयाची मॉडेल स्कूल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शाळेच्या इमारत दुरुस्तीकामासाठी एकूण १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच टप्प्याटप्प्याने ही कामे पूर्ण केली जातील.

पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. आता ही इमारत दुरुस्ती करण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील शाळेला एक नवीन स्वरूप प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या दिवसांत शाळेला नवीन, सुसज्ज असे मैदान प्राप्त होणार आहे.

- डॉ. दिव्या राणे, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT