Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

आरोग्य सुविधा उपकेंद्रांच्या दारी: विश्‍वजीत राणे

मूलभूत सुविधांसाठी नवा उपक्रम

दैनिक गोमन्तक

पणजी: आरोग्य सुविधा जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच राज्यातील सर्व उपआरोग्य केंद्रांत अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात आज आरोग्य खात्याच्या विविध अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. केंद्र सरकारची आरोग्याबाबत काही धोरणे आहेत. त्यासाठी नीती आयोगाने मंजुरी दिलेले प्रकल्प लवकरच हाती घेतले जातील. जनतेसाठी ‘आरोग्य सुविधा उपकेंद्रांच्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली. आल्तिनो येथील वन भवनमध्ये मंत्री राणे यांनी आज आरोग्य खाते तसेच उपकेंद्रांच्या अधिकाऱ्यांसह इस्पितळातील वैद्यकीय अधीक्षकांची एकत्रित बैठक घेतली.

आरोग्य केंद्रांतच पुरेशा सुविधा: यावेळी राज्यातील आरोग्य सुविधा व सेवा अधिक मजबूत करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकांना पुरेशा सुविधांसाठी गोमेकॉ तसेच दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात न येता त्यांना त्या सुविधा तेथीलच उपकेंद्रांत उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. गोमेकॉ, सुपर स्पेशालिटी ब्लॉक येथे डायलिसीस सेवा सुरू केली आहे. ही सेवा उपजिल्हा इस्पितळातही उपलब्ध केली आहे. आता रक्त तपासणी सेवा लोकांना उपकेंद्रांवरच कशाप्रकारे देता येईल, यावर अधिकाऱ्यांकडून मते मागवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

SCROLL FOR NEXT