Govind Gaude  Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude : कला अकादमीच्या कामात भ्रष्टाचार दिसत असेल तर सिद्ध करा; गोविंद गावडेंचं थेट आव्हान

आपल्यालाही कला अकादमीचं काम लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं गावडेंनी सांगितलं आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Govind Gaude : गोवा कला अकादमी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरु करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. अकादमीच्या कामात कोणताही घोटाळा झालेला नाही. कला अकादमीचं काम पारदर्शकरित्या करण्यात आलं आहे. मात्र अकादमीच्या कामात भ्रष्टाचार दिसत असेल तर तो सिद्ध करावा, असं थेट आव्हान कला आणि संकृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिलं आहे.

जे लोक कला अकादमीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं सांगत आहेत, त्यांनी मला सवाल विचारण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम खात्याला याची विचारणा करावी. निविदा प्रक्रिया न राबवताच कला अकादमीच्या नुतनीकरणाचं काम सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरु केलं आहे. यात कला आणि संस्कृती खातं किंवा आपला कोणताही हस्तक्षेप नाही, असं गोविंद गावडेंनी स्पष्ट केलं आहे. आपल्यालाही कला अकादमीचं काम लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं गावडेंनी सांगितलं आहे.

दरम्यान फिफा अंडर-17 महिला विश्व चषकाचा उद्घाटन सोहळा 10 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचंही क्रीडामंत्री गोविंद गावडेंनी सांगितलं आहे. बांबोळीतील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर हा दिमाखदार सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर उपस्थित राहणार आहेत. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे गोव्यातील मुलींना फुटबॉल या खेळाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फिफाच्या सामन्यांना शाळेतील मुलांना उपस्थित राहता यावं याची व्यवस्था करण्यात आल्याचही गोविंद गावडेंनी स्पष्ट केलं आहे. गोव्यातील सामन्यांना फुटबॉलप्रेमींची मोठी उपस्थिती लाभेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

Sonam Wangchuk Hunger Strike: "मी भूत बनून परत येईन...", सोनम वांगचुक यांचा थेट इशारा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम

Sohail Khan: 'माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला, पण भीतीमुळे कुणालाही सांगितलं नाही'; सोहेल खानचा धक्कादायक खुलासा

Goa Monsoon: गोव्यात पावसाचं कमबॅक! सत्तरीतील रस्ते जलमय, मुसळधार सरींमुळे बळीराजा सुखावला

SCROLL FOR NEXT