National Herald controversy reaction Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'हेराल्ड' प्रकरणावरून भाजप आक्रमक, कॉंग्रेस कार्यालयासमोर राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Rahul Gandhi National Herald case: कोट्यवधीचा भ्रष्टाचार करूनही आपण काहीच केले नसल्याचा आविर्भाव ते आणत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करत असल्याचे कुंकळ्येकर यांनी सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात जाणीवपूर्वक राजकीय हेतूने भाजप गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत असल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने आज कॉंग्रेस प्रदेश कार्यालयासमोर कॉंग्रेस नेते राहुल गांधीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदविला.

यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर, सिद्धार्थ नाईक, गिरिराज पै वेर्णेकर, सर्वानंद भगत, सिद्धार्थ कुंकळ्येकर व इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

समीर नाईक म्हणाले, नॅशनल हेराल्डच्या आस्थापनांचाच जर विचार केला तर कोट्यवधीची संपत्ती आहे. कुठलाही पक्ष कर्ज देऊ शकत नाही, असे अशा प्रकारचा भ्रष्टाचार करूनही राजकीय हेतूने कारवाई केली, असे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही भाजप युवा मोर्चाचा वतीने कॉंग्रेसचा निषेध करत आहे.

कॉंग्रेस सत्तेत असताना सर्व सरकारी यंत्रणा आपल्याहाती असल्याने आपले कुणीही वाकडे करणार नाही, असा समज कॉंग्रेसचा झाला होता. परंतु ज्यावेळी मोदींचे सरकार आले त्यावेळी त्यांचे एकेक कारनामे समोर आलेत.

न्यायालयानेही त्यांना याबाबतीत दोषी ठरविले आहे. कोट्यवधीचा भ्रष्टाचार करूनही आपण काहीच केले नसल्याचा आविर्भाव ते आणत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करत असल्याचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT