Mayem Protest against Mining Transport Dainik Gomantak
गोवा

मयेतील आंदोलन तापले, सरपंचांसह पत्रकार ताब्यात

भूमिकेशी ठाम राहिल्याने काही आंदोलनकर्त्यांवर पोलिसांची कारवाई

Tukaram Sawant

डिचोली : मयेतील खाण वाहतूक विरोधी आंदोलनाला बुधवारी दुपारी वेगळेच वळण मिळाले. आंदोलक आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने अखेर स्थानिक सरपंचांसह छायाचित्रकार तसेच काही नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. धूळ प्रदूषण आणि बेदरकार खनिज वाहतुकीने त्रस्त बनलेल्या मयेतील स्थानिकांनी बुधवारी सकाळी खनिज वाहतूक अडवली होती.

धूळ प्रदूषण टाळण्यासाठी अगोदर रस्ते पाण्याने भिजवा. पाण्याची समस्या दूर करा, अशी मागणी करीत पैरा येथील चौगुले खाणीवरून (Mining) खनिज घेऊन आलेले ट्रक गावकरवाडा येथे बुधवारी सकाळी स्थानिकांनी अडवले. आंदोलनस्थळी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी मयेत (Mayem) आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. मात्र बराचवेळ चर्चा करूनही तोडगा निघत नसल्याने आणि नागरिक आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. सरपंच सीमा आरोंदेकर, त्यांचे पती संजय आरोंदेकर आदी नागरिकांसह दै.'गोमन्तक'चे छायाचित्रकार संदीप देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस स्थानकात नेले.

दरम्यान, कळसोत्सवानिमित्त दोन दिवस बंद असलेली खनिज वाहतूक मंगळवारी मध्यरात्रीच सुरु करण्यात आली. बेदरकार आणि अनियंत्रित वाहतुकीमुळे कळसोत्सवानिमित्त भाविकांनी उभारलेल्या तोरणांची मोडतोड झाल्याने नागरिक नाराज बनले आहेत. बेदरकार वाहतूक (Traffic) आणि धूळ प्रदूषण यामुळे त्रस्त बनलेल्या मयेतील जनतेने मंगळवारी 8 मार्च रोजीही सुमारे तासभर खनिज वाहतूक रोखली होती. यानंतर सरपंचांनी खनिज वाहतुकीस विरोध केला होता. त्यामुळे आधीच वादात असलेल्या खनिज वाहतुकीसमोर दरदिवशी एक संकट उभे ठाकत असल्याचं चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तुम्हाला दिवाळीत काय मिळालं? सोनपापडी की ड्रायफ्रूट्स? 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना थेट iPhone 16 गिफ्ट केला! नेटकरी म्हणाले, 'व्हॅकन्सी आहे का?'

America Sanctions 2026: निवडणुकीतील पराभवाचा राग भारतावर? ट्रम्पकडून भारतीय दाम्पत्यासह 9 कंपन्यांवर कठोर निर्बंध; इराणला मदत केल्याचा आरोप

Private Bus Safety: बसची क्षमता 48, पण प्रवासी तब्बल 140! म्हापशात कामगारांच्या जिवाशी खेळ; खासगी बस ताब्यात

Goa Politics: बोरकरांची खोलकरांना नोटीस; 3 दिवसांत माफी मागा, अन्यथा 6 कोटींचा मानहानी खटला!

WPL 2027 चं बिगुल वाजलं! पहिल्याच सामन्यात स्मृतीची 'आरसीबी' भिडणार हरमनप्रीतच्या 'मुंबई इंडियन्स'शी; पाहा स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक!

SCROLL FOR NEXT