Protest Against illegal building in old goa Dainik Gomantak
गोवा

ओल्ड गोव्यातील 'त्या' इमारतीविरोधात सत्याग्रह सुरुच

इमारतीमुळे हेरिटेज धोक्यात, कारवाई होईपर्यंत साखळी उपोषणाचा इशारा

दैनिक गोमन्तक

ओल्ड गोवा : ओल्ड गोव्यातील अनधिकृत बंगल्याविरोधात स्थानिक नागरिकांनी सत्याग्रह सुरुच ठेवला आहे. तब्बल 85 दिवस नागरिकांनी हा सत्याग्रह चालवला आहे. हे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे, मात्र अजूनही हा बंगला पाडण्यात न आल्याने सत्याग्रह आणखी तीव्र केला आहे. (Protest Against illegal building in old goa News Updates)

ओल्ड गोवा (Old Goa) ग्रामपंचायतीने याआधीच संबंधित बंगल्याच्या मालकाला नोटीस बजावली आहे. हा अनधिकृत बंगला तातडीने पाडण्याचा आदेश पंचायतीने नोटीसीद्वारे दिला आहे. मात्र असं असलं तरीही संबंधित मालकाने हा बंगला अजून तोडलेला नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्थानिकांनी आपलं आंदोलन (Protest) आणखी जोरात सुरु केलं आहे. दरम्यान स्थानिकांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.

जोपर्यंत या अनधिकृत इमारतीवर कारवाई होत नाही तोपर्यंत सत्याग्रह सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसंच ओल्ड गोव्यातील नागरिकांनी इमारत तोडेपर्यंत साखळी उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे पंचायत आता याप्रकरणात काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या अनधिकृत इमारतीमुळे ओल्ड गोव्यातील हेरिटेजला (Heritage) धोका उत्पन्न झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच! एकानं ठोकलं ताबडतोब त्रिशतक, दुसऱ्याचं द्विशतक; 50 ओव्हर्समध्ये उभा केला 822 धावांचा डोंगर

IPL 2026 Points Table: पंजाबचा विजयाचा रथ रुतला, हाय-स्कोअरिंग सामन्यात दिल्लीनं मारली बाजी; गुणतालिकेत मोठा उलटफेर

अमेरिकेत महापौरपदी 'चीनी एजंट'! 'US News Center' च्या नावाखाली चालवला प्रोपगंडा; ईलीन वांगला होणार 10 वर्षांची शिक्षा?

Vish Yog 2026: ग्रहांच्या महायुतीनं बनला 'विष योग'! 3 राशींच्या डोक्यावर संकटाची टांगती तलवार; शनीची चाल बदलणार नशीब

Viral Video: 'दोरी ओलांडली अन् भारतात घुसले'; पाकिस्तानी इन्फ्लुएंसरचा अजब दावा, नेटकऱ्यांनी काढली चांगलीच खोड

SCROLL FOR NEXT