Protest against complaints against doctors by Goa department Dainik Gomantak
गोवा

गोवा विभागातर्फे डॉक्टरांविरुद्धच्या तक्रारींचा निषेध

‘आयएमए’तर्फे मुख्यमंत्र्यांना आणि पोलिसांना निवेदन

दैनिक गोमन्तक

पणजी: रुग्णांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून उपचारासंदर्भात निष्काळजीपणाचा ठपका ठेवून होत असलेल्या सतावणुकीचा व दाखल केल्या जाणाऱ्या तक्रारींचा आज इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) गोवा विभागातर्फे येथील जुन्या गोमेकॉ इस्पितळाजवळ निषेध करत निदर्शने केली.

त्यानंतर आयएमएने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याप्रकरणांची दखल सरकारने घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.हुशार महिला डॉक्टरावर उपचारादरम्यान झालेल्या कथित निष्काळजीपणाचा ठपका ठेवून तिच्यावर खुनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. या गुन्ह्यामुळे महिला डॉक्टर तणावाखाली होती. त्यानंतर तिने टोकाची भूमिका घेत आत्महत्या केली होती. या घटनेमुळे देशात डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली.

डॉक्टर हे रुग्णांची सेवा करतात तरीही रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचा दोष डॉक्टरावर ठेवला जातो. पोलिस यंत्रणाही घटनेची कोणतीच शहानिशा न करता किंवा खातरजमा न करता कोणाच्या तरी सांगण्यावरून डॉक्टरांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या जातात. अशा प्रकरणांना आळा न बसल्यास डॉक्टारांकडून उपचार होऊनही नाहक सतावणुकीला सामोरे जावे लागते म्हणून डॉक्टर किचकट ऑपरेशनसाठी पुढे येणार नाही. त्यामुळे सरकारने या संदर्भात गोवा मेडिकेअर सर्व्हिस पर्सनल व मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्युशन्स कायदा २०१३ नुसार समिती स्थापन करण्याची मागणी आयएमएने केली. आयएमएतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या निषेध व निदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष डॉ. रुफिन मोंतेरो, डॉ. शेखर साळकर इतर डॉक्टर्स उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Smart City: पणजी होणार 'स्मार्ट आणि सुरक्षित'; उर्वरित भागातही बसवले जाणार सीसीटीव्ही

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8 व्या वेतन आयोगाआधी 'महागाई भत्त्या'त दोनदा होणार वाढ

Goa POCSO Case: इन्स्टाग्रामवरची मैत्री बेतली अंगलट; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला!

Team India: गौतम गंभीरला 'इग्नोर' करत आहेत सीनियर खेळाडू? ड्रेसिंग रूममध्ये धुसफूस, 'BCCI'पर्यंत पोहोचली नाराजी

Tata Group Crisis: टाटांच्या 'ट्रस्ट'वरच अविश्वासाचे सावट? ऐतिहासिक वारसा असलेल्या समूहात सत्तेवरून वादाची ठिणगी!

SCROLL FOR NEXT