पणजी: चिंबल येथील तोयार तलावाजवळ प्रस्तावित युनिटी मॉल, प्रशासकीय स्तंभ हे प्रकल्प सरकारातील ज्या मंत्र्यास व्हावेत असे वाटत आहेत, त्या मंत्र्याने ते येथून अन्यत्र हलवावेत, असा सल्ला आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी दिला.
नाईक यांनी रविवारी चिंबल ग्रामस्थांनी आमदार, जिल्हा पंचायत सदस्य आणि सरपंचांच्या घरावर काढलेल्या मोर्चात सहभाग नोंदवत हा सल्ला दिला. नाईक म्हणाले, आम्ही चिंबेलच्या जनतेसोबत आहोत.
भाजप सरकारला युनिटी मॉल उभारायचाच असेल, तर तो त्यांनी अन्य मतदारसंघात हलवावेत. राज्यातील मंत्री तोयार तलावाचा वापर कोणी करीत नाही, असे म्हणतात, यावरून कोणतेही जलसाठ्याचे ठिकाण ‘वापरात नाही’ असे म्हणून नष्ट करणार का?
‘आप’चे उपाध्यक्ष सुनील सिंगणापूरकर यांनी भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले, चिंबेलच्या ग्रामस्थांना भाजप नेते ‘फटिंग’ म्हणतात, हा त्यांचा सरळसरळ अपमान आहे. येथील जनता शांततेने आपली जमीन, जलस्रोत आणि पर्यावरणाचे संरक्षण करत आहे. येथील जनतेचे ऐकून घेण्याऐवजी भाजप त्यांचा अपमान करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.