

पणजी : चिंबल येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या तीव्र आंदोलनाचा भाग म्हणून रविवारी आंदोलनकर्त्यांनी आमदार, जिल्हा पंचायत सदस्य व सरपंचांच्या घरांवर मोर्चा काढत युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी केली.
मेरशी चौकात सकाळी लोक एकत्र जमू लागले. सव्वादहाच्या सुमारास मोर्चा आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या घरावर नेण्यात आला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घराबाहेरच अडविले. त्यामुळे मोर्चेकरांनी तेथेच ठिय्या मांडला. त्यानंतर हा मोर्चा जिल्हा पंचायत सदस्या गौरी कामत व सरपंच संदेश शिरोडकर यांच्या घरांकडे वळविण्यात आला.
चिंबल जैवविविध समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर म्हणाले की, युनिटी मॉल व प्रशासन स्तंभाला विरोध म्हणून आम्ही उपोषण सुरू केले आहे. सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने आम्हाला हा मोर्चा काढावा लागला. हा आमचा हक्काचा लढा आहे.
वाल्मिकी नाईक (आप प्रदेशाध्यक्ष) : एकही मंत्री चिंबलमध्ये लोकांना भेटायला आलेला नाही. लोक वापरत नाहीत म्हणून तळी आणि राने संपवायची ही सरकारची मानसिकता आहे.
अजय खोलकर (आरजी) : हरमल, करमळीत आंदोलनामुळे प्रकल्प थांबले; मग चिंबलकरांना का लढावे लागत आहे?
शायनी ओलिव्हेरा (माजी जिल्हा पंचायत सदस्य) : चिंबल गावात अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, पण युनिटी मॉलसाठी आहेत.
१३ जानेवारी : पंचायतीत जाऊन विचारणार जाब
१४ जानेवारी : न्यायालयीन निकाल अपेक्षित
१५ जानेवारी : विधानसभेवर शांततामय मोर्चा
प्रतिकूल निकाल आल्यास उच्च न्यायालयात दाद
या आंदोलनाला ‘आरजी’ची फूस आहे. आंदोलनकर्त्यांनी सभांमध्ये शिवीगाळ केल्यामुळे संवाद साधणे अवघड झाले. प्रकल्पामुळे तोय्यार तळ्याला हानी होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलनकर्त्यांना सरकारने चर्चेसाठी बोलावले, पण ‘आरजी’ने त्यांना रोखले.
रुडॉल्फ फर्नांडिस, आमदार (सांताक्रुझ)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.