Solar Energy  Dainik Gomantak
गोवा

Goa Solar Energy: ‘धरणां’वर सौरऊर्जा निर्मितीचा प्रस्ताव पडून? धक्कादायक माहिती उघड

Solar Energy Development: वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सौरऊर्जा निर्मितीसाठी गावात सौरऊर्जा निर्मिती केंद्रे उभारण्याचे ठरविले असले तरी अद्याप धरणांच्या पाण्यावर संयंत्रे बसवून सौरऊर्जा निर्मितीचा प्रस्ताव पडून असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Dam-Based Solar Power Project Faces Setback At Goa

पणजी: वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सौरऊर्जा निर्मितीसाठी गावात सौरऊर्जा निर्मिती केंद्रे उभारण्याचे ठरविले असले तरी अद्याप धरणांच्या पाण्यावर संयंत्रे बसवून सौरऊर्जा निर्मितीचा प्रस्ताव पडून असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा असा तरंगता सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प पाहणीसाठी सोमवारी व मंगळवारी केंद्र सरकारने अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. यात गोव्यातून तीन अधिकारी सहभागी होणार आहेत.

या पाहणीनंतर तरी राज्यातील धरणांचा वापर सौरउर्जा निर्मितीसाठी होणार का, असा प्रश्न त्यामुळे चर्चेला आला आहे. ओंकारेश्वर येथे ६०० मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते. त्याची पाहणी करण्यासाठी देशभरातील अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा केंद्रीय नवीन व नवीतम ऊर्जा मंत्रालयाने आयोजित केला आहे.

दरम्यान, राज्यातील धरणांच्या पाण्यांवर तरंगते प्रकल्प उभारून १९७ मेगावॅट विजेची निर्मिती करता येऊ शकते, अशी माहिती वीजमंत्री ढवळीकर यांनी विधानसभेत दिली होती. राज्यातील चार धरणांत १ हजार ३०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ही सौरऊर्जा निर्मिती करण्यात येणार होती. एसजेव्हीएन ग्रीन एनर्जी या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने तसा प्रस्तावही राज्य सरकारला दिला होता. साळावली, आमठाणे, अंजुणे आणि चापोली धरणांचा अभ्यास त्यासाठी करण्यात आला होता.

पडिक जमिनीचा वापर करावा!

राज्यात पुरेशी सौरऊर्जा तयार होत नसल्याबद्दल गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. या समितीचे मार्गदर्शक जोसेफ डिसोझा यांनी सांगितले, की राज्यातील बहुतांश पडिक जमीन ही कूळ कायद्याखालील आहे. त्या कायद्यातील तरतुदीनुसार ती शेतीव्यतिरीक्त अन्य कारणासाठी वापरली जाऊ शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT