World Table Tennis Dainik Gomantak
गोवा

World Table Tennis: भारताच्या टेबल टेनिसपटूंची आश्वासक सुरवात

डब्ल्यूटीटी : हरमीत देसाई, सनिल शेट्टी पुरुष पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

World Table Tennis:  वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारतासाठी आशास्थान असलेल्या हरमीत देसाई व सनिल शेट्टी या प्रमुख पुरुष खेळाडूंनी निराशा केली नाही. आश्वासक खेळ करत त्यांनी पात्रतेची दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेच्या पात्रता फेरीला सोमवारपासून ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरवात झाली. हरमीतने जागतिक क्रमवारीत वरच्या स्थानी असलेल्या इंग्लंडच्या टॉम जार्विस याला हरविले. तुलनेत सनिलसाठी सामना सोपा ठरला.

जागतिक क्रमवारीत हरमीत 141 व्या, तर जार्विस 121 व्या स्थानी आहे. पाच गेमच्या लढतीत हरमीतने 3-2 (9-11, 12-10, 12-10, 11-13, 12-10) असा विजय नोंदविला. जागतिक क्रमवारी 210 व्या स्थानी असलेल्या सनिलने देशवासीय यशांश मलिक याचा 3-0 (11-3, 11-3, 11-8) असा सहज पाडाव केला.

‘‘जार्विसविरुद्ध मी तिसऱ्यांदा खेळत होतो. यापूर्वी दोन वेळा निर्णायक गेममध्ये मला हार पत्करावी लागली होती. यावेळेस लढत अटीतटीची ठरली, मात्र मी बाजी मारली. हाच फॉर्म मला बाकी लढतींसाठी कायम राखायचा आहे,’’ असे हरमीतने सामन्यानंतर सांगितले.

मिश्र दुहेरीत यजमान खेळाडूंचे पराभव

मिश्र दुहेरीत भारताच्या स्नेहित सुरावाजुल्ला व दिया चितळे जोडीस पॅट्रिक फ्रान्सिस्का व शॅन शिओना जोडीकडून 1-3 (5-11, 5-11, 13-11, 8-11) अशी हार पत्करावी लागली, जर्मन जोडीने नंतर इंग्लंडच्या सॅम्युएल वॉकर व हो तिन-तिन जोडीस नमवून राऊंड ऑफ 16 फेरीसाठी पात्रता मिळविली.

मिझुकी ओईकावा व मियू नागासाकी या जपानी जोडीने भारताच्या रोनित भांजा व सुतिर्थ मुखर्जी जोडीवर 3-0 (11-8, 11-8, 11-8) असे नमविले. त्यापूर्वी त्यांनी अव्वल मानांकित फ्रेंच जोडी फेलिक्स लेब्रु व प्रिथिका पावडे जोडीस 3-2 असे हरविले होते.

कोरियाच्या चो देसोंग व नायोंग किम जोडीने भारताच्या मनुष शाह व श्रीजा अकुला जोडीस चुरशीच्या लढतीत 3-2 (3-11, 7-11, 11-5, 11-5, 11-9) असे नमविले. मनुष व श्रीजा जोडीने दुसरी फेरी गाठताना देशवासीय विदित देसाई व प्रिथोकी चक्रवर्ती जोडीस 3-0 (11-1, 11-2, 11-5) असे पराजित केले होते.

कोरियाच्या गँगयेओन पार्क व ह्योबिन यून जोडीने राऊंड ऑफ 16 फेरी गाठताना भारताच्या यशस्विनी घोरपडे व पायस जैन जोडीला 3-1 (11-9, 11-9, 5-11, 11-5) असे हरविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT