Water problem Dainik Gomantak
गोवा

पिसुर्लेत तीव्र पाणी टंचाई; कोटी रुपयांचा प्रकल्प नावालाच!

ग्रामस्थांत संताप: सहनशीलता संपली, महिलांची मोर्चाची तयारी

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात येणाऱ्या पिसुर्ले पंचायत क्षेत्रात येणाऱ्या सर्व प्रभागांत गेल्या कित्येक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. कोट्यवधीचा प्रकल्प असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी नावालाच असलेल्या प्रकल्पाबाबत संताप व्यक्त केला आहे. पाणी पुरवठा विभागाने पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास संबंधित खात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेऊ, असा इशारा या भागातील महिलांनी दिला आहे.

या पंचायत क्षेत्रात एकूण सात प्रभाग येतात, या भागात खाण व्यवसायामुळे येथील सर्व नैसर्गिक झरे, विहीरी, तळी लुप्त झाली आहेत, त्यामुळे येथील लोकांना पूर्ण पणे नळाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.

परंतु सदर पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदर भागात गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला असून पाण्यासाठी कुठे जायचे, असा मोठा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

या गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या प्रयत्नाने पिसुर्ले शांतीनगर येथे कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी प्रकल्प उभारला आहे, सदर पाणी पुरवठा प्रकल्पात पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी सोडले जाते व ते पाणी नंतर या भागातील नागरिकांना वितरीत केले जाते. परंतु एवढी सगळी यंत्रणा उभी करूनही लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते, ही फार मोठी शोकांतिका आहे,अशी खंत पिसुर्ले पंचायत सदस्य देवानंद परब यांनी व्यक्त केली.ते म्हणाले, लोकांची सहनशीलता संपत आली आहे.

तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. येथील पाणी पुरवठा प्रकल्पात मुबलक पाणी असूनही ते का सोडले जात नाही असा प्रश्न पंच देवानंद परब यांनी उपस्थित केला आहे. नवनिर्वाचित आमदार डॉ. दिव्या राणे यांनी या प्रकरणी लक्ष घालून या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

खाण कंपन्यांच्या टॅंकरवरच तूर्त भिस्त !

पिसुर्ले गावातील लोकांची तहान खाण कंपन्यांच्या वतीने सुरू असलेल्या टॅंकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे भागत आहे, परंतु सदर पाणी अपुरे पडत असल्याने भर उन्हाळ्यात लोकांची गैरसोय होत आहे. या गावांतील बाजूला बंद असलेल्या खाण कंपन्यांच्या खंदकात लाखो लिटर पाणी जमा झाले असून, त्या पाण्याचा नियोजन पूर्ण वापर केल्यास कित्येक गावात पाण्याची सोय होऊ शकेल, मात्र त्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT