Truck Canva
गोवा

Truck Owners Demand: ट्रकमालकांची मुख्यमंत्र्यांकडे आर्थिक मदतीची मागणी! खाण सुरु करा अन्यथा ट्रक विकून टाकू; प्रोग्रेसिव्ह असोसिएशनचे गाऱ्हाणे

Goa Truckers Economic Crisis पडून राहिलेले ट्रक दुरुस्ती करण्याचे मोठे आव्हान ट्रकमालकांवर आहे. हल्लीच दक्षिण गोवा प्रोग्रेसिव्ह ट्रकमालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन ट्रकमालकांना आर्थिक मदतीची मागणी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Progressive Truck Owners Association demands financial assistance from cm pramod sawant

सासष्टी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात खाण उद्योग सुरू होईल असे जाहीर करून गेली अनेक वर्षे वापराविना पडून राहिलेले ट्रक रस्त्यांवर धावताना दिसू लागतील असे म्हटले होते. मात्र, तत्पूर्वी पडून राहिलेले ट्रक दुरुस्ती करण्याचे मोठे आव्हान ट्रकमालकांवर आहे. हल्लीच दक्षिण गोवा प्रोग्रेसिव्ह ट्रकमालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन ट्रकमालकांना आर्थिक मदतीची मागणी केली.

पत्रकारांकडे बोलताना असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की खाण उद्योग सुरू होणार याचा आम्हाला संशयच आहे. खाण उद्योग आज ना उद्या सुरू होणार यासाठी ट्रकमालक प्रत्येक वर्षी ट्रक दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करीत आहेत. सरकारवर विश्र्वासून आम्ही ट्रकांची दुरुस्ती करीत असतो. आता मात्र ट्रक दुरुस्तीवर आणखी पैसे खर्च करण्याची ताकद आमच्यात राहिलेली नाही.

ट्रकसाठी आम्ही जो वर्षभरात कर भरतो, तोसुद्धा रद्द करावा अशी आमची मागणी आहे. खाण उद्योग सुरू करणार हे सरकारने स्पष्ट करावे. जर सरकार खाण उद्योग सरू करीत नसेल, तर आम्ही आमचे ट्रक विकून टाकू व सरकारने आम्हाला पर्याय द्यावा, असेही या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

‘ट्रक दुरुस्तीसाठी दीड लाख द्या’

जर सरकार खरोखरच खाण उद्योग सुरू करीत असेल, तर प्रत्येक ट्रकमागे दुरुस्तीसाठी सरकारने कमीत कमी एक ते दीड लाख रुपये आर्थिक मदत आम्हाला द्यावी अशी आमची मागणी आहे. एकदा का ट्रक कामाला लागले की त्यातून ही रक्कम सरकारने वसुल करावी असा आमचा प्रस्ताव असल्याचेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT