Goa Fish Market of SGPDA Dainik Gomantak
गोवा

एसजीपीडीएच्या नव्या अध्यक्षांसमोर मासळी मार्केटच्या समस्यांचे मोठे आव्हान

सजीपीडीएच्या नव्या अध्यक्षांसमोर मासळी मार्केटच्या समस्या मोठे आव्हान

दैनिक गोमन्तक

सासष्टी: एसजीपीडीएचे अध्यक्ष म्हणून वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी पदभार सांभाळला आहे. मात्र मडगावमधील घाऊक व किरकोळ मासळी विक्री मार्केटमधील व तेथील मासळी विक्रेत्यांचे प्रश्र्न सोडविणे हे नव्या अध्यक्षासमोर मोठे आव्हान असणार आहे.
शिवाय गोमंतकीय व परप्रांतिय मासळी विक्रेते हा वादही उफाळुन येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

(problems of fish market are a big challenge for the new president of SGPDA)

सद्या घाऊक मासळी मार्केट जवळील जागेत नवी इमारत बांधण्यात येत असल्याने मासळी मार्केटची जागा बांधकाम सामानाने व्यापुन गेली आहे. त्यामुळे मासळी घेऊन येणारी वाहने रस्त्यावरच थांबवून मासळी उतरवली जात आहे. शिवाय मासळी विक्रेते रस्त्यावरच बसुन विक्री करत असल्यामुळे व गिऱ्हाईकांची गर्दी असल्याने वाहतुकीला अडथळा जाणवू लागला आहे. शिवाय आता पश्र्चिम बगल रस्ता जवळुनच जात असल्याने या रस्त्यांवरुनची वाहतुक वाढली आहे.
तसेच घाऊक मासळी मार्केटच्या रस्त्यावरच्या दोन्ही बाजुला दुचाकी व चार चाकी वाहने पार्क करुन ठेवली गेल्याने मासळी विक्रेते व गिऱ्हाईकांना भयंकर त्रास सोसावा लागत आहे. तशातच परप्रांतिय मासळी विक्रेत्यांची संख्या वाढल्याने गोमंतकीय मासळी विक्रेत्यांपुढे मोठी समस्या उदभवली आहे. हे परप्रांतिय मासळी विक्रेते पहाटे येऊनच जागा अडवून बसतात व गोमंतकीय मासळी विक्रेत्यांना नंतर जागा मिळत नसल्याची तक्रार एका गोमंतकीय मासळी विक्रेत्या वाईने केली.

तक्रार करुनही नगरपालिका, एसजीपीडीए आमच्याकडे दुर्लक्ष करतात असे त्या बाईने सांगितले. किरकोळ मासळी मार्केटमध्ये तर मासळी विक्रेते आता गिऱ्हाईकांना फिरण्यासाठी जी मोकळी जागा ठेवली आहे.

तिथेच आपल्या मासळीचे पाटले ठेवून विक्री करु लागले आहेत. रात्रीच्या वेळी सुद्धा मासळी विक्रेत्यांना वीज पुरवठ्याचा त्रास सोसावा लागत आहे. या मार्केटमधील अस्वच्छता हा एक जटील प्रश्र्न आहे. बर्फाचे पाणी किंवा मासळी विक्रेते मासळी धुण्यासाठी पाणी वापरतात ते तिथेच सांडते. त्यामुळे त्या पाण्यातुनच गिऱ्हाईकांना फिरावे लागते शिवाय दुर्गंधीचा त्रास होतो
आमदार दाजी साळकर यानी अध्यक्षपदाची सुत्रे हातात घेतली त्या दिवशी पत्रकारांनी हा प्रश्र्न त्यांच्यासमोर मांडला होता. त्यानी अधिकाऱ्यांशी सविस्तर बोलणी करुन व प्रत्यक्ष पहाणी करुन त्यावर तोडगा काढणार असल्याचे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT