alex reginald Dainik gomantak
गोवा

आलेक्स रेजिनाल्ड यांच्या अडचणी वाढल्या

रेजिनाल्ड आता काय भूमिका घेतात याकडे सर्वाचंच लक्ष

दैनिक गोमन्तक

काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड (Congress Aleixo Reginaldo) यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर मतदार संघातील आणि कार्यकर्त्यांची नाराजी लक्षात घेत त्यांनी 27 दिवसात तृणमूल काँग्रेसला देखील राजीनामा दिला. आणि परत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अस बोलल जात होत. मात्र, त्यांना आता काँग्रेसची दार बंद झाल्याच स्पष्ट दिसत आहे. कारण कुडतरी मतदारसंघातून मोरेना रिबेलो यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आलेक्स रेजिनाल्ड यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, कुडतरीचे काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी तृणमूल काँग्रेसची वाट धरल्याने त्यांचा पत्ता कट झाल्याचं चित्र आहे. मागच्याच आठवड्यात रेजिनाल्ड यांनी तृणमूल पक्षाचा राजीनामाही दिला होता. तृणमूलमध्ये (TMC) जाणे ही आपली मोठी चूक होती. आपण आपल्या कार्यकर्त्यांना विचारात घेतलं नव्हतं. मात्र आता आपण आपल्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच पुढील पाऊल उचलणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे रेजिनाल्ड (Aleixo Reginaldo Lourenco) आता काय भूमिका घेतात याकडे सर्वाचंच लक्ष असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT