पणजी: पॅलेस्टाईन आणि इस्त्रालय यांच्या सुरु असलेल्या युद्धाचे पडसाद सध्या जगभर उमटताना दिसत आहेत. गोव्यात देखील याप्रकरणी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. काही नागरिकांनी राजधानीतील प्रसिद्ध इमॅक्युलेट चर्च समोर निदर्शने केली. यावेळी जमावाने पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा दिल्या. दरम्यान, पोलिसांनी निदर्शन करणाऱ्यांना ताब्यात घेतले.
राजधानी पणजीतील प्रसिद्ध इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चसमोर पॅलेस्टाईनच्या समर्थनात एकत्र आलेल्या नागरिकांनी इस्त्रालच्या सैनिकी कारवाईचा निषेध नोंदवला. यावेळी पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
उपस्थित नागरिकांना यावेळी गाझाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पोस्टर झळकावले. तेथील नागरिकांच्या हक्कासाठी समर्थन देण्याची मागणी करणारे पोस्टर हातात घेऊन नागरिकांनी उपस्थिती लावली होती. चर्चसमोरील पायऱ्यांवर बसून नागरिक निदर्शने करत होते.
या निदर्शनात पुरुष महिला यांच्यासह तरुण - तरुणीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होते. चर्चसमोर सुरु असणारी निदर्शने बेकायदेशीर असल्याचे म्हणत आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, यावेळी उपस्थितांनी पोलिसांशी हुज्जत घातली. खूप वेळ गोंधळातच झालेल्या चर्चेनंतरही आंदोलकांनी हटण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
दरम्यान, सायंकाळच्या सुमारास देखील पुन्हा एकदा आंदोलक एकत्र येऊन घोषणा देऊ लागले. पोलिसांनी याठिकाणी देखील दाखल होत आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी नागिकांनी फ्री पॅलेस्टाईनचा बोर्ड हातात घेऊन इस्त्राईलचा निषेध नोंदवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.